IND v AUS Test : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. या मालिकेत भारतीय संघाच्या विजयापेक्षा सलामीवीर केएल राहुलचा फॉर्म अधिक ट्रेंड करत आहे. राहुलने मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांच्या तीन डावात केवळ 38 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत केएल राहुलबाबत टीम इंडियाचे दोन माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात ट्विटरवर एक युद्ध सुरू झाले, जे अद्याप संपण्याचे नाव घेत नाही.(Venkatesh Prasad slams Aakash Chopra over KL Rahul)
ट्विटर वॉर व्यंकटेश प्रसादने पुन्हा एकदा सुरु केले आहे. सलग 5-6 ट्विट करत त्यांनी आकाशला टोला लगावला. वेंकटेशने आकाशचा 11 वर्ष जुना ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या ट्विटमध्ये आकाशने रोहित शर्माचा प्लेइंग-11 मध्ये समावेश आणि अजिंक्य रहाणेला स्थान न देण्यावर खिल्ली उडवली होती. 30 डिसेंबर 2012 रोजी आकाशने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'रहाणेला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळालेले नाही. तर 'प्रतिभावान' रोहितला जागा मिळाली आहे.
या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत व्यंकटेशने विचारले की, जेव्हा आकाश 24 वर्षीय रोहितची खिल्ली उडवू शकतो, तेव्हा 31 वर्षीय केएल राहुलबद्दल मी काही बोलू शकत नाही का? स्क्रिनशॉट शेअर करत व्यंकटेशने लिहिले की, जेव्हा रोहित शर्मा 24 वर्षांचा होता आणि त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर फक्त 4 वर्षांचे होते, तेव्हा आकाशने हे ट्विट केले होते. तो 24 वर्षांचा असलेल्या रोहितची खिल्ली उडवू शकतो आणि मी 31 वर्षांचा आणि 8 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द असलेल्या केएल राहुलच्या खराब कामगिरीचा उल्लेखही करू शकत नाही.
खरं तर, केएल राहुलवर टीका केल्याबद्दल आकाश चोप्राने व्यंकटेश प्रसाद यांना त्यांच्या यूट्यूब चॅनलवर फटकारले. यावर व्यंकटेशने आता उत्तर दिले की, 'माझा मित्र आकाश चोप्राने एक यूट्यूब व्हिडिओ बनवला आहे आणि मला अजेंडा पेडल म्हटले आहे. कोणत्याही खेळाडूविरुद्ध माझा कोणताही अजेंडा नाही. लोकांमध्ये मतभेद असू शकतात. पण माझ्या मते आकाशने आपला वैयक्तिक अजेंडा म्हणून आणि ट्विटरवर विरुद्ध मत आणू नका असे म्हणणे हास्यास्पद आहे. माझ्याकडे केएल किंवा इतर कोणत्याही खेळाडूविरुद्ध काहीही नाही. माझा आवाज फक्त चुकीची निवड आणि वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या विरोधात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.