India Tour of Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऐतिहासिक विजयाची नोंद करणाऱ्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियन (Australian Captain) कर्णधाराने वादग्रस्त वक्तव्य केल आहे. युवांचा भरणा असलेल्या टीम इंडियाने (Team India) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली कांगारुंना पराभूत करण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाने मालिका जिंकली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ 36 धावांत ऑल आउट झाला. त्यावेळी भारतीय संघ कसोटी मालिका जिंकेल, असे कोणालाही वाटले नाही. पण विराटच्या अनुपस्थितीत आणि प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीनंतर युवा खेळाडूंनी दाखवलेल्या परिपक्वतेच्या जोरावर भारताने मालिका जिंकून दाखवली.
भारतीय संघाने खेळ बाजूला ठेवून इतर गोष्टीचा गवगवा करत मालिका जिंकली, असे ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने म्हटले आहे. भारतीय खेळाडूंनी अनावश्यक गोष्टीच्या माध्यमातून आमच्या खेळाडूंचे लक्ष विचलित केले. भारतीय संघाकडून मिळालेला पराभव पचनी पडलेला नसल्यामुळेच टिम पेन आता नको त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसते.
पेन याने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये पराभव मान्य करण्याचे सोडून भारतीय खेळाडूंवरच आरोप केले आहेत. अनावश्यक गोष्टींचा फुकाचा गाजावाजा करण्यात ते (टिम इंडिया) माहिर आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणार नसल्याची टूम वाजवत टीम इंडियाने आमच्या खेळाडूंचे लक्ष विचलित केले. त्यांच्या या डावाला आम्ही भूललो आणि मालिका गमावण्याची वेळ आली, अशा आशयाचे वक्तव्य ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत कठोर नियमालीवरुन भारतीय खेळाडू ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात खेळण्यास तयार नाहीत, असे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिले होते. या मुद्यावरुन चांगलीच चर्चाही रंगली. याचाच दाखला देत टिम पेनने भारतीय संघावर नाहक आरोप केले आहेत. गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 328 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान पार करत भारतीय संघाने मालिका जिंकली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.