19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव करत आपले चौथे विजेतेपद पटकावले. U19 वर्ल्डकपमध्ये भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत पराभूत झाला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 254 धावांचे आव्हान ठेवले. हरजास सिंगने दमदार फलंदाजी करत 55 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑलिव्हर पिकने नाबाद 46 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
यानंतर 254 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या भारताचा डाव 174 धावात संपुष्टात आल्या. भारताकडून आदर्श सिंहने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर मुर्गन अभिषेकने 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेअर्डमन आणि मॅकमिलन यांनी प्रत्येकी 3 तर वाईल्डरने 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताची मधली फळी देखील कापून काढत भारताची अवस्था 6 बाद 91 अशी केली. मात्र त्यानंतर सलामीवीर आर्दश सिंहने 77 चेंडूत 47 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बिअर्डमनने त्याची खेळी देखील संपवत भारताला 115 धावांवर सातवा धक्का दिला.
कर्णधार सहारन बाद झाल्यानंतर भारतीय संघाला सचिन धसचाच सहारा होता. मात्र मॅकमिलनने त्याला 8 धावांवर बाद केलं अन् भारताची अवस्था 4 बाद 68 धावा अशी केली.
ऑस्ट्रेलियाच्या दमदार गोलंदाजीमुळे भारताची धावगती प्रचंड मंदावली. भारत सध्या 3.31 अशा धावगतीने धावा करत आहे. त्यातच बिअर्डमनने उदय सहारनची विकेट घेत भारताचे टेन्शन वाढवले आहे. भारताची अवस्था 3 बाद 55 धावा अशी झाली आहे.
संथ सुरूवातीनंतर धावांची गती वाढवण्याची वेळ आली त्यावेळी मुशीर खान 22 धावा करून बाद झाला. बिअर्डमनने त्याचा त्रिफळा उडवला
भारताची पहिली विकेट पडल्यानंतर मुशिर खान आणि आदर्श सिंहने संथ फलंदाजी केली. भारताच्या 8 षटकात 20 धावा झाल्या आहेत.
कॅलम वाईड्लने भारताचा सलामीवीर अर्शिन कुलकर्णीला 3 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऑलिव्हर पिकने 46 धावांची नाबाद खेळी करत आठव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी रचली. या भागिदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 253 धावांपर्यंत मजल मारली.
मुशिर खानने गेल्या सामन्यातील हिरो राफ मॅकमिलनला 2 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला 6 बाद 189 धावा अशी केली.
64 चेंडूत 55 धावांची खेळी करणाऱ्या हरजास सिंगची अखेर सौम्य पांडेने शिकार केली. त्याने अर्धशतकवीर सिंगला बाद करत कांगारूंना पाचवा धक्का दिला.
हरजास सिंगचा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फारसा चांगला खेळ झाला नव्हता. मात्र अंतिम सामन्यात त्याने दमदार अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला 180 धावांच्या जवळ पोहचवले.
डिक्सन बाद झाल्यानंतर आलेल्या हरजास सिंग आणि रेयान हिक्सने चौथ्या विकेटसाठी 68 चेंडूत 66 धावांची भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी राज लिंबानीने फोडली. त्याने हिक्सला 20 धावांवर बाद केलं.
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने ह्युज वेबगेनला 48 धावांवर बाद करत जोडी फोडली होती. त्यानंतर सलामीवीर डिक्सनला देखील 42 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 99 अशी केली.
राजने सॅमला शुन्यावर बाद करत कांगारूंची अवस्था 1 बाद 16 धावा अशी केली होती. मात्र हॅरी डिक्सन आणि ह्युज वेबगेनने ऑस्ट्रेलियाला 10 षटकात 45 धावांपर्यंत मजल मारून दिली.
वेगवान गोलंदाज राज लिंबानीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने सॅम कोनस्टासला शुन्यावर बाद केले.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल.
भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता विजेतेपदाची लढत सुरू होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. भारताने गेल्या दोन सामन्यात कांगारूंचा पराभव केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.