U-19 WC Ind vs Aus Final : रोहित शर्माचे स्वप्न उदय पूर्ण करणार? WTC, ODI वर्ल्डकपनंतर आता U-19 च्या फायनलमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया

U-19 World Cup India vs Australia Final : भारत-ऑस्ट्रेलिया आज अंतिम सामना
U-19 World Cup India vs Australia Final marathi news
U-19 World Cup India vs Australia Final marathi news sakal
Updated on

U-19 World Cup India vs Australia Final : रोहित शर्माच्या टीम इंडियाला तीन महिन्यांपूर्वी जे यश मिळवता आले नाही ते यश उदय सहारन याची १९ वर्षांखालील टीम मिळवणार का ? १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच भारताचे प्रतिस्पर्धी असणार आहे. हा सामना आज होणार आहे.

सीनियरमध्ये एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दोनदा पराभव करून विजेतेपद उंचावलेले आहे, पण १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत दोनदा ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीयांनी अजिंक्यपद मिळवलेले आहे. आज तिसऱ्यांदा हे वर्चस्व राखण्याची संधी असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा विजेतेपदाचा सन्मानही मिळवण्याची संधी असेल.

U-19 World Cup India vs Australia Final marathi news
Ranji Trophy : महाराष्ट्र संघाचा पाय खोलात! विदर्भच्या संघाचे वर्चस्व

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ कमालीच्या फॉर्मात आहे. मुळात गतविजेते असल्याचा हे पाठबळ आहे. कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि गोलंदाज सौम्यकुमार पांडे यांनी आपला दरारा निर्माण केला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार वेबगेन, सलामीवीर हॅरी डिक्सन आणि वेगवान गोलंदाज टॉम स्टेकर व कॅलम विडलर यांचा धोका भारतीयांना होऊ शकतो. या स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वाटचालीत मोलाची कामगिरी केलेली आहे.

U-19 World Cup India vs Australia Final marathi news
Ranji Trophy : छत्तीसगडच्या घातक गोलंदाजीसमोर कर्णधार रहाणेच्या मुंबई संघाची घसरगुंडी! ६१ धावांत गमावले ९ फलंदाज

ठिकाण : बिनोनी (दक्षिण आफ्रिका)

वेळ : दुपारी १.३० पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस आणि हॉटस्टार

हे खेळाडू आहेत फॉर्मात

यंदाच्या स्पर्धेत उदय सहारन सर्वाधिक ३८९ धावा करणारा फलंदाज आहे, तर डावखुरा फिरकी गोलंदाज सौम्य पांडेने सर्वात जास्त १७ विकेट मिळवलेल्या आहेत. मुशीर खाननेही शतकी खेळी साकार केलेली आहे, तर बीडचा हरहुन्नरी फलंदाज सचिन धस याचे सलग दुसरे शतक चार धावांनी हुकले होते.

U-19 World Cup India vs Australia Final marathi news
Ranji Trophy : छत्तीसगडच्या घातक गोलंदाजीसमोर कर्णधार रहाणेच्या मुंबई संघाची घसरगुंडी! ६१ धावांत गमावले ९ फलंदाज

इतिहास भारताच्या बाजूने

१९ वर्षांखालील विश्वकरंडक अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया २०१२ आणि २०१८ मध्ये एकमेकांशी भिडले होते. या दोन्ही वेळेस भारताने बाजी मारलेली आहे. २०१८ मध्ये पृथ्वी शॉ कर्णधार होता. त्या संघात शुभमन गिलही होता. तर २०१२ मध्ये उन्मुक्त चंद कर्णधार होता.

२०१६ च्या स्पर्धेपासून भारत प्रत्येक स्पर्धेत अंतिम सामने खेळलेला आहे. यात २०१८, २०२२ मध्ये विजेतेपद मिळवता आले, तर २०१६ आणि २०२० मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

हे खेळाडू झाले स्टार

१९ वर्षांखाली विश्वकरंडक स्पर्धेत खेळल्यानंतर भारताच्या मुख्य संघातून स्टार झालेल्या खेळाडूंमध्ये युवराज सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंत, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ आणि उन्मुक्त चंद मागे पडले. चंदला तर मुख्य संघात स्थानही मिळाले नाही. गतवेळचा विजेता कर्णधार यश धुल यालाही मुख्य प्रवाहात येता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.