Ind vs Aus 2nd Test Virat Kohli : भारताचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहली पाच वर्षांनंतर दिल्लीत कसोटी खेळणार आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2017 मध्ये त्याच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर खेळला होता.
ज्यामध्ये विराटने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात 243 आणि दुसऱ्या डावात 50 धावा केल्या. तो पुन्हा एकदा या मैदानावर धावा करण्यासाठी सज्ज झाला आहे. सरावासाठी कोहली त्याच्या कारमधून स्टेडियममध्ये पोहोचला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार बुधवारी त्याच्या गुरुग्रामच्या घरातून एकटाच गाडी चालवत स्टेडियममध्ये पोहोचला. त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. कोहलीच्या कारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोहली ज्या कारमधून स्टेडियमवर पोहोचला ती पोर्शे पनामेरा टर्बो होती.
या कारची शोरूम किंमत 2.21 कोटी रुपये आहे. पनामेरा टर्बो 3.1 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 315 किलोमीटर प्रति तास आहे. कोहलीची ही कार त्याचा भाऊ विकास कोहलीने 2020 मध्ये खरेदी केली होती.
अरुण जेटली स्टेडियमवर कोहलीने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये 78 च्या सरासरीने एकूण 467 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने द्विशतक झळकावले. विराटला त्याच्या घरच्या मैदानावर कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवायचा आहे. नोव्हेंबर 2019 पासून त्याला कसोटीत शतक झळकावता आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.