Ind Vs Aus World Cup Final: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखो चाहत्यांचा 'हनुमान चालिसे'चा जप; व्हिडिओ व्हायरल...

Ind Vs Aus World Cup Final
Ind Vs Aus World Cup Final
Updated on

Ind Vs Aus World Cup Final:  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण संघाच्या एअर शोसह अनेक मनोरंजक क्षण पाहायला मिळाले. तसेच सामना सुरू होण्यापूर्वी उपस्थित चाहत्यांनी 'हनुमान चालीसा'चा एकसुरात केलेला जप केला.  चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली आणि हनुमान चालिसाचे पठण केले.

स्टेडियमच्या क्षमतेनुसार पूर्ण भरले होते आणि चाहते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहेत. सलग 10 सामन्यात विजयानंतर भारताने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केल्याने चाहत्यांनी 'भारत माता की जय'च्या घोषणाही दिल्या.

आज तत्पूर्वी, भारतीय वायुसेनेच्या (IAF) सूर्यकिरण एरोबॅटिक संघाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर एअर शो केला. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या सदस्यांनी काही थरारक फॉर्मेशन्स दाखवले आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उड्डाण केले. (Latest Marathi News)

1996 मध्ये स्थापन झालेल्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये भारतीय हवाई दलातील उच्च प्रशिक्षित वैमानिकांचा समावेश आहे जे एरोबॅटिक्समध्ये त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. या संघाने हॉक एमके 132 विमान उडवून भारतातील तसेच परदेशातील अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

Ind Vs Aus World Cup Final
IND vs AUS Final: भारत अजूनही जिंकू शकतो... फक्त 'या' गोष्टींची काळजी घ्यावी लागेल

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 47 धावांची शानदार खेळी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. याशिवाय विराट कोहलीने 54 धावांची खेळी खेळली. विराटच्या विकेटनंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. केएल राहुलने 66 धावांची खेळी करत संघाला 200 च्या पुढे नेले होते.

ऑस्ट्रेलिया  संघाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले. याशिवाय जोश हेझलवूड आणि कर्णधार कमिन्सने 2-2 विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Ind Vs Aus World Cup Final
Surya Kumar Yadav Trolled : 'तू आम्हाला नाराज केलं'! नेटकऱ्यांनी सुर्यावर केली आगपाखड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.