Ind vs Aus WTC Final Day 2 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final च्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले मात्र दिवसाचा खेळ संपता संपता ऑस्ट्रेलियाने पुन्हा सामन्यावर आपली पकड निर्माण केली. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावात संपवला. मात्र भारताने आपल्या पहिल्या डावाची सुरूवात खराब केली. दिवसअखेर कांगारूंनी भारताची अवस्था 5 बाद 151 धावा अशी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने 48 धावा करून झुंज देण्याचा प्रयत्न केला. जडेजाने आणि अजिंक्य रहाणेने पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. मात्र जडेजा दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटके राहिली असतानाच बाद झाला.
भारतीय गोलंदाजांनी WTC Final च्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले. भारतीय गोलंदाजांनी या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्स घेतल्या. तर कांगारूंना या सत्रात 24 षटकात फक्त 65 धावा करता आल्या. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 422 धावा झाल्या होत्या.
दुसऱ्या सत्रात भारताने 95 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव उरलेल्या तीन विकेट्स 47 धावात घेत कांगारूंचा पहिला डाव 469 धावात संपुष्टात आणला. मोहम्मद सिराजने 28.3 षटकात 108 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
भारताची अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जेडजा ही जोडी जमली असे वाटत होते. जडेजाही 48 धावांपर्यंत पोहचला होता. भारत आजचा दिवस आरामात खेळून काढेल असा अंदाज वर्तवला जात असतानाचा नॅथन लॉयनने त्याला बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. अखेर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 5 बाद 151 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे 29 धावा करून तर केसी भरत 5 धावा करून नाबाद होता.
भारताची अवस्था 4 बाद 71 अशी झाली असताना रविंद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणेने पाचव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 125 धावांपर्यंत पोहचवले. जडेजाने आक्रमक पवित्र्यात फलंदाजी केली तर अजिंक्य रहाणेने एक बाजू लावून धरली होती.
भारताचे दोन्ही सलामीवीर 30 धावांवर माघारी गेल्यानंतर पुजाराने विराटच्या साथीने भारताला अर्धशतकापर्यंत पोहचवले. मात्र पुजारानेही गिलसारखीच चेंडू सोडण्याची चूक केली अन् तो 14 धावांवर ग्रीनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.
यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने डाव सावरण्याचा प्रयत्न करत संघाला सत्तरी पार करून दिली. मात्र मिचेल स्टार्कने विराट कोहलीला 14 धावांवर बाद करत भारताला चौथा आणि मोठा झटका दिला.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारताने आपला पहिला डाव सुरू केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पॅट कमिन्सने रोहित शर्माला 15 तर बोलँडने शुभमन गिलला 12 धावांवर बाद करत भारताची अवस्था 2 बाद 30 अशी केली. भारताने टी पर्यंत 2 बाद 37 धावांपर्यंत मजल मारली. खेळ थांबला त्यावेळी विराट कोहली 4 तर चेतेश्वर पुजारा 3 धावा करून नाबाद होते.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने कांगारूंची अवस्था 3 बाद 361 वरून 7 बाद 422 अशी केली होती. या सत्रात भारताने 95 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव उरलेल्या तीन विकेट्स 47 धावात घेत कांगारूंचा पहिला डाव 469 धावात संपुष्टात आणला. मोहम्मद सिराजने 28.3 षटकात 108 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
भारतीय गोलंदाजांनी WTC Final च्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर आपले वर्चस्व निर्माण केले. भारतीय गोलंदाजांनी या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्स घेतल्या. तर कांगारूंना या सत्रात 24 षटकात फक्त 65 धावा करता आल्या. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 422 धावा झाल्या होत्या. अॅलेक्स कॅरी 22 तर पॅट कमिन्स 2 धावा करून नाबाद होते.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशीच्या 3 बाद 327 धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. स्टीव्ह स्मिथने दिवसाच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. या चौकारांमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसाप्रमाणे याही दिवशी वर्चस्व गाजवणार असे वाटते होते. त्यात ट्रेविस हेडने आपले दीडशतक पूर्ण केले.
स्मिथ - हेड जोडी भारताला दुसऱ्या दिवशीही सतावणार असे वाटत असतानाच सिराजने ट्रेविस हेडला 163 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनला शमीने सहा धावांवर बाद करत कांगारूंचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.
भारताने जरी पाठोपाठ दोन विकेट घेतल्या असल्या तरी स्मिथ अजून क्रिजवर होता. ऑस्ट्रेलिया 400 च्या जवळ पोहचत होती. स्टीव्ह स्मिथ 121 धावा करून मोठी खेळी करण्याच्या इराद्यात होता. मात्र लॉर्ड शार्दुलने त्याचा त्रिफळा उडवत भारताला मोठा दिलासा दिला. यानंतर अक्षरने मिचेल स्टार्कला 5 धावांवर धावबाद करत कांगारूंना लंचपूर्वी सातवा धक्का दिला.
भारताने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड हे दोन्ही शतकवीर बाद केले. याचबरोबर ग्रीनची देखील 6 धावांवर विकेट घेतली. यानंतर फिल्डिंगसाठी मैदानात आलेल्या अक्षर पटेलने मिचेल स्टार्कला 5 धावांवर धावबाद केले.
स्टीव्ह स्मिथ 268 चेंडूत 121 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार मारले. शार्दुल ठाकूरने त्याला बोल्ड करत बत्या गुल केल्या. आता अॅलेक्स कॅरीसोबत मिचेल स्टार्क क्रीजवर आहे. 99 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 बाद 387 आहे.
मोहम्मद शमीने भारताला पाचवे यश मिळवून दिले आहे. त्याने कॅमेरून ग्रीनला दुसऱ्या स्लिपमध्ये शुभमन गिलकडे झेलबाद केले. ग्रीनने सात चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने सहा धावा केल्या.
ट्रॅव्हिस हेड शतक झळकावून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला झेलबाद केले. ट्रॅव्हिस हेडने 174 चेंडूत 163 धावा केल्या. त्याच्या खेळीत 25 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आता कॅमेरून ग्रीन स्टीव्ह स्मिथसोबत क्रीजवर उपस्थित आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 92 षटकांत 4 बाद 367 अशी आहे.
ट्रॅव्हिस हेडच्या धावसंख्येने 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथनेही शतक पूर्ण केले आहे. या दोघांमधील उत्कृष्ट भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 350 धावांच्या जवळ पोहोचली आहे. आता या सामन्यात कांगारू संघ खूपच मजबूत स्थितीत आहे.
ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथनेही आपले शतक पूर्ण केले आहे. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर स्मिथने दोन चौकार मारून शतक ठोकले. या मैदानावरील त्याचे हे तिसरे शतक आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायला एक तासापेक्षा कमी वेळ बाकी आहे. खेळ दुपारी 3 वाजता सुरू होईल, जिथे भारत ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.