WTC Final : शेवटच्या दिवशी 99 टक्के पाऊस करणार खेळखंडोबा, कोणता संघ येणार अडचणीत? जाणून घ्या हवामान अंदाज

Ind vs Aus Day 5 london Weather Report
Ind vs Aus Day 5 london Weather Report
Updated on

IND vs AUS Day 5 London Weather Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना शेवटच्या दिवशी पोहोचला आहे. मात्र अद्याप ही ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार हे निश्चित झालेले नाही.

ऑस्ट्रेलियाने भारताला 444 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 3 गडी गमावून 164 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे क्रीजवर आहेत. टीम इंडियाच्या आशा दोन्ही खेळाडूंवर आहेत. मात्र या सामन्यावर काळे ढग दाटून आले आहेत.

Ind vs Aus Day 5 london Weather Report
Ind vs Pak Asia Cup: आशिया कपच्या ठिकाणाबाबत मोठा निर्णय, सामने होणार पाकिस्तानात! वर्ल्ड कपसाठीही आले अपडेट

लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच पावसाची शक्यता होती. सामन्याच्या पहिल्या चार दिवशी पाऊस पडला नाही, पण शेवटच्या दिवशी असे होण्याची शक्यता खूप जास्त आहे. मात्र असे झाल्यास दोन्ही संघांच्या अडचणी वाढू शकतात.

Ind vs Aus Day 5 london Weather Report
Ind vs Aus WTC Final: शुबमन गिल खरंच आऊट होता का? कॅमेरून ग्रीनने वादग्रस्त झेलवर तोडले मौन, म्हणाला...

भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता तर लंडनमध्ये सकाळी साडेदहा वाजता कसोटी सामना सुरू होईल. हवामान खात्यावर विश्वास ठेवला तर लंडनमध्ये रविवारी 9 वाजता पावसाची 61 टक्के शक्यता आहे. तो हळूहळू कमी होईल पण नंतर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

भारतीय संघ पावसापूर्वी जास्तीत जास्त धावा करू इच्छितो जेणेकरून लक्ष्य नंतर फार मोठे होऊ नये. जर सामन्याच्या ओव्हर्समध्ये कट असेल तर हा सामना ड्रॉ होणार नाही तर राखीव दिवशी जाईल. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच पावसाचा व्यत्यय आल्यास सामना सहाव्या दिवशीही सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.