Ind vs Aus WTC Final: शुबमन गिल खरंच आऊट होता का? कॅमेरून ग्रीनने वादग्रस्त झेलवर तोडले मौन, म्हणाला...

Shubman Gill Catch Controversy
Shubman Gill Catch Controversy
Updated on

Shubman Gill Catch Controversy : टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिल खरंच आऊट होता का? तो आऊट होता तर एवढा गोंधळ कशाला? कर्णधार रोहित शर्मापासून ते अनुभवी सुनील गावसकरापर्यंत या निर्णयावर नाराज होते.

आता ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक कॅमेरून ग्रीनने शुबमन गिलच्या वादग्रस्त झेलवर मौन सोडत संपूर्ण सत्य सांगितले आहे. त्याने गिलचा क्लीन कॅच घेतला असे का वाटले हे ग्रीनने सांगितले. थर्ड अंपायर व्यतिरिक्त सोशल मीडियावर लोकांनी ग्रीन आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला वाईट रित्या ट्रोल केलं.

Shubman Gill Catch Controversy
Shubman Gill Catch Controversy: भारतावर अन्याय? वादग्रस्त झेलवर शुभमन गिलची प्रतिक्रिया, ICCचा नियम काय सांगतो

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कॅमेरून ग्रीन पत्रकार परिषदेला आला तेव्हा त्याला या वादग्रस्त झेलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शुबमन गिलच्या वादग्रस्त झेलबद्दल ग्रीनला विचारले असता तो म्हणाला, त्यावेळी मला वाटले की मी हा झेल पकडला आहे. जेव्हा मी झेल घेतला तेव्हा मला वाटले की मी घेतलेला क्लीन झेल होता. मी तो झेल अचूक पकडला हे मला स्पष्ट झाले. पण त्यानंतर मी तो निर्णय थर्ड अंपायरवर सोडला जे माझ्या झेलशी सहमत आहेत.

Shubman Gill Catch Controversy
Ind vs Aus : चॅम्पियन होण्यासाठी टीम इंडियाला 540 चेंडूत 280 धावांची गरज! माजी कर्णधार अन् उप-कर्णधारवर भारताची मदार

भारतीय डावातील आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडकडे चेंडू सोपवला आणि त्याने ओव्हरचा पहिला चेंडू चांगल्या टाकला. शुभमन गिलला या चेंडूचा बचाव करायचा होता. चेंडू बॅटची कड घेऊन ग्रीनच्या दिशेने गेला. जिथे कॅमेरून ग्रीनने डायव्ह मारत चेंडू एका हाताने पकडला.

Shubman Gill Catch Controversy
French Open : इगा स्विअतेकचे तिसरे फ्रेंच विजेतेपद

सामन्याबाबत बोलायचे झाले तर, रविवारी पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. टीम इंडिया या धावांचा पाठलाग करून विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकतो. भारताने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 विकेट गमावून 164 धावा केल्या होत्या. आता संपूर्ण जबाबदारी विराट कोहली आणि सध्या क्रीजवर असलेल्या अजिंक्य रहाणेवर आहे. विराट 44 आणि रहाणे 20 धावांवर नाबाद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.