WTC Final Rahul Dravid : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ विजेतेपदासाठी सज्ज आहेत. कसोटी चॅम्पियनशिपचा दुसरा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे आजपासून सुरू होईल. या सामन्यासाठी टीम इंडियाचे प्लेइंग 11 अद्याप ठरलेले नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र प्रशिक्षक द्रविडने आपल्या कोचिंगबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी सांगितले की, अलिकडच्या वर्षांत झालेल्या सामन्यांच्या संख्येमुळे भारतीय संघाला अनेक फॉरमॅटमध्ये खेळाडूंचा वापर करण्यास भाग पाडले आहे. 'ओव्हल' येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलच्या आधी, द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या अनुभवाबद्दल सांगितले.
द्रविड म्हणाला की, आमच्याकडे काही अनुभवी खेळाडू आहेत, आम्ही गेल्या 18 महिन्यांत अनेक युवा खेळाडूंना आजमावले आहे. तीन वेगवेगळ्या फॉरमॅटमुळे आणि भारतीय संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या यामुळे आम्हाला अधिक खेळाडू वापरावे लागले. आपल्या क्रिकेट व्यवस्थेत बरेच खेळाडू येतात आणि बाहेरही जातात. हा माझ्यासाठी खरोखरच रोमांचक आणि एक उत्तम शिकण्याचा अनुभव आहे.
तो पुठे म्हणाला, खूप मजा आली आहे. या काळात मला अनेक खेळाडूंसोबत काम करण्याची आणि चांगले संबंध निर्माण करण्याची संधी मिळाली. भारतीय प्रशिक्षक म्हणाले की या 18 महिन्यांत मी एक व्यक्ती म्हणून माझ्याबद्दल आणि कोचिंगबद्दलही खूप काही शिकलो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.