Ind vs Aus WTC Final Day 1 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final आजपासून ओव्हलवर सुरू झाली. पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवत मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 3 बाद 327 धावा केल्या. ट्रॅविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने चौथ्या विकेटसाठी नाबाद 251 धावांची भागीदारी रचली. हेडने नाबाद 146 तर स्मिथने नाबाद 95 धावा केल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला लंचपर्यंत दोन धक्के दिले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्राचा खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 73 धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर डेव्हिड वॉर्नरने 60 चेंडूत 43 धावा करत मार्नस लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. मार्नस 26 धावांवर नाबाद होता.
लंचनंतर मोहम्मद शमीने मार्नसचा त्रिफळा उडवत कांगारूंना मोठा धक्का दिला. मात्र या धक्क्यातून स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेडने संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. हेडने आक्रमक फलंदाजी केली तर स्मिथ त्याला एका बाजूने साथ देत होता. या दोघांनी संघाला दीडशतकी मजल मारून दिली.
चहापानंतर स्टीव्ह स्मिथने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ट्रेविस हेडने शतकी मजल मारली. त्यांनी दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद दीडशतकी भागीदारी रचत संघाला 200 पार पोहचवले. जसजसा WTC Final चा पहिला दिवस समाप्तीकडे जात असताना या दोघांनी ऑस्ट्रेलियाला 250 च्या पुढे पोहचवले.
दिवस अखेरपर्यंत स्मिथ आणि हेडने आपली भागीदारी 251 धावांपर्यंत पोहचवली. ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या होत्या. ट्रेविस हेड 146 धावा करून तर स्मिथ 95 धावा करून नाबाद होते. भारताकडून मोहम्मद समी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ट्रेविस हेडने शतकी तर स्मिथने अर्धशतकी खेळी करत चौथ्या विकेटसाठी नाबाद दीडशतकी भागीदारी रचली. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने चहापानानंतर 230 धावांच्या पार पोहचवले.
मार्नस बाद झाल्यानंतर आलेल्या ट्रेविस हेडने आक्रमक फलंदाजी करत स्मिथसोबत चौथ्या विकेटासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला दीडशतकी मजल मारून दिली.
पहिल्या सत्रात दमदार गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीला अखेर लंचनंतर पहिली विकेट मिळाली. त्याने 26 धावांवर खेळणाऱ्या मार्नस लाबुशानेचा त्रिफळा उडवत कांगारूंना तिसरा धक्का दिला.
पहिल्या 10 षटकात एक विकेट गमावलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशग्ने यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवणारा असे दिसत असतानाच शार्दुल ठाकूरने 43 धावा ठोकणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला बाद केले.
भारताने पहिल्या 10 षटकात दमदार गोलंदाजी करत कांगारूंच्या फलंदाजांना शांत ठेवले. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला शुन्यावर बाद करत कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर वॉर्नर आणि मार्नस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ऑस्ट्रेलियासाठी महत्वपूर्ण असलेला पहिला तास खेळून काढळा.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवत पहिल्या 15 चेंडूत कांगारूंना एकही धाव घेऊ दिली नाही. मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात सलामीवीर उस्मान ख्वाजाला शुन्यावर बाद करत कांगारूंना पहिला धक्का दिला. ख्वाजाने भारतात झालेल्या वॉर्डर गावसकर ट्रॉफीत चांगली फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना सतावले होते. मात्र सिराजने त्याला शुन्यावर बाद केले.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड.
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विनला संधी मिळालेली नाही. भारतीय संघात रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणे बऱ्याच काळानंतर कसोटी सामना खेळत आहे.
Ind vs Aus WTC Final Day 1 Live : हवामानाच्या अंदाजानुसार, ओव्हलवर होणाऱ्या या अंतिम सामन्यावर पावसाचा मोठा धोका आहे. वास्तविक पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हवामान ठीक असेल पण चौथ्या दिवशी पावसाचा मोठा धोका आहे जो निर्णायक ठरू शकतो. म्हणजे शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सामना राखीव दिवशी जाऊ शकतो.
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.