IND vs BAN: कोणाला मिळणार संधी! लक्ष ऋषभ पंतवर...

भारतीय संघ आता कसोटी क्रिकेटकडे! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मालिका महत्त्वाची
ind vs ban 1st test preview prediction
ind vs ban 1st test preview predictionsakal
Updated on

India vs Bangladesh Test Series : व्हाईटबॉल क्रिकेटचा ओव्हरडोस झाल्यानंतर भारतीय संघ आता प्रदीर्घ कालावधीनंतर पारंपरिक कसोटी क्रिकेट खेळणार आहे. यावेळी बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत असून मालिका विजयासह कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य आहे.

ind vs ban 1st test preview prediction
FIFA WC22: मेस्सी-अल्वारेझची किमया! अर्जेंटिना सहाव्यांदा फायनलमध्ये

येत्या चार महिन्यांत भारतीय संघ सहा कसोटी सामने खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची मालिका आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवायचे असेल तर बांगलादेशविरुद्धची ही मालिका 2-0 अशी जिंकावी लागणार आहे.

कसोटी सामन्यांच्या मालिकेस सुरुवात करताना भारतासमोर प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न सुटलेला नाही. जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा, महम्मद शमी आणि आता रोहित शर्मा (खेळताना दुखापत) या हुकमी खेळाडूंशिवाय बांगलादेशमध्ये मैदान मारायचे आहे.

याअगोदर भारतीय संघ इंग्लंडमध्ये शिल्लक राहिलेल्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला होता. रोहितसह केएल राहुलही अनफिट असल्याने बुमराने नेतृत्व केले होते, परंतु पहिल्या डावात चारशेपेक्षा अधिक धावा करूनही हार स्वीकारावी लागली होती.

ind vs ban 1st test preview prediction
IND vs BAN: टीम इंडियाच्या कोचचा मोठा खुलासा! टीम मॅनेजमेंट कधीच ऋषभ पंतला...

कोणाला संधी मिळणार?

रोहित, बुमरा, जडेजा, शमी यांच्याऐवजी भारतीय संघात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे, परंतु प्रत्यक्षात अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणाला संधी मिळते हे महत्त्वाचे ठरणार आहे. धावांचा पाऊस पाडत असलेल्या अभिमन्यू ईश्वरनचा समावेश करण्यात आलेला असला, तरी सलामीला राहुलसह शुभमन गिल यालाच पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे.

अक्षर की कुलदीप?

जडेजाच्या अनुपस्थितीमुळे फिरकीची धुरा अनुभवी आर. अश्विनवर असणार आहे. त्याच्या साथीला अक्षर पटेल की कुलदीप यादव, यापैकी कोणाला संधी मिळणार हे महत्त्वाचे आहे. भारतीय संघात सौरभ कुमार हा नवा चेहराही पर्याय म्हणून उपलब्ध आहे.

खेळपट्टी फलंदाजांना पोषक असेल आणि त्यानंतर फिरकीस साथ देईल असा अंदाज आहे, त्यामुळे भारतीय संघ तीन वेगवान की तीन फिरकी गोलंदाज, यापैकी कशी रचना करतो यावर संघनिवड ठरणार आहे. महम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल; मात्र त्याच्या साथीला उमेश यादव, नवदीप सैनी आणि जयदेव उनाडकट यापैकी कोणाला संधी दिली जाते हे महत्त्वाचे आहे.

ind vs ban 1st test preview prediction
Football : सेक्स स्कँडल! कोणाला मागावी लागली होती होणाऱ्या पत्नीची जाहीर माफी?

ऋषभ पंतवर लक्ष

धडाकेबाज फलंदाज असा लौकिक असणारा आणि तिन्ही प्रकारांत खेळत असलेल्या ऋषभ पंतला सध्या टी-२० आणि एकदिवसीय संघात स्थान मिळेनासे झाले आहे, त्यामुळे कसोटी सामन्यात तो सर्व उणीव भरू काढण्याच्या तयारीत असेल.

संघ यातून निवडणार ः

  • भारत ः केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर. अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, नवदीप सैनी, जयदेव उनाडकट, महम्मद सिराज, सौरभ कुमार, कोना भारत, कुलदीप यादव, अभिमन्यू ईश्वरन

  • बांगलादेश ः शकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, मुशफिकर रहिम, मोईनुल हक, मेहदी हसन, मोहम्मदूल हसन, अनामुल हक, खलीद अहमद, एबादोत हुसैन, शोफिफुल इस्लाम, तस्किन अहमद, तैजुल इस्लाम, नजमुल हुसैन, रेजुल रेहमान, झाकिर हसन, नुरुल हसन आणि यासीर अली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.