India vs Bangladesh Live Cricket Score : भारताने बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात 227 धावांनी पराभव करत आपली लाज वाचवली. भारताचा सलामीवीर इशान किशनच्या धडाकेबाज 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या. विजयासाठी 410 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव 182 धावात गुंडाळला. भारताकडून सर्वच गोलंदाजांनी चांगला मारा केला. शार्दुल ठाकूरने 3 तर अक्षर पटेल, उमरान मलिकने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 43 धावा केल्या.
कुलदीप यादवने शाकिब अल हसनच्या झुंजार 43 धावांची खेळी संपवल्यानंतर मोहम्मदुल्ला देखील 20 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने अफिफ हुसैनला 8 धावांवर बाद करत बांगलादेशला सातवा धक्का दिला.
उमरान मलिकने यासिर अलीला 25 धावांवर पायचीत पकडत बांगलादेशला चौथा धक्का दिला.
बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर अनुभवी फलंदाज शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र 12 व्या षटकात अक्षर पटेलने मुशफिकूर रहीमचा 7 धावांवर त्रिफळा उडवत भारताला तिसरे यश मिळवून दिले.
भारताने बांगलादेशसमोर 410 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला भारताने दोन धक्के दिले. अक्षर पटेलने अनमुल हकला 8 तर मोहम्मद सिराजने लिटन दासला 29 धावांवर बाद केले.
भारताने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून इशान किशनने 210 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 113 धावांची खेळी केली. या दोघांनी 290 धावांची भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले.
390 धावांच्या स्कोअरवर भारताची सहावी विकेट पडली आहे. अक्षर पटेल 17 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. तस्किन अहमदने त्याला क्लीन बोल्ड केले. अक्षरने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. 48 षटकांनंतर भारताची धावसंख्या 6 बाद 398 आहे.
विराट कोहलीही शतक झळकावून बाद झाला आहे. भारताचा निम्मा संघ 344 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोहलीने 91 चेंडूत 113 धावा केल्या. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. शाकिब अल हसनने त्याला झेलबाद केले. आता अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीझवर आहेत.
344 धावांच्या स्कोअरवर भारताची चौथी विकेट पडली. लोकेश राहुल 10 चेंडूत आठ धावा करून बाद झाला. त्याला इबादत हसनने क्लीन बोल्ड केले.
विराट कोहलीने आपले 44 वे वनडे शतक पूर्ण केले आहे. त्याने 85 चेंडूत एक षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 72 वे शतक आहे. इशानच्या द्विशतकानंतर कोहलीच्या शतकामुळे भारताची धावसंख्या 350 धावांच्या जवळ पोहोचली आहे.
320 धावांच्या स्कोअरवर भारताची तिसरी विकेट पडली. श्रेयस अय्यर तीन धावा करून बाद झाला. इबादत हसनने त्याला झेलबाद केले. श्रेयसने आठ चेंडूत तीन धावा केल्या. आता विराट कोहली आणि लोकेश राहुल क्रीजवर आहेत.
इशान किशनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने आतापर्यंत 126 चेंडूंत 23 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 200 धावा केल्या आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या 300 धावांच्या जवळ आहे. त्याचबरोबर विराट कोहलीही शतकाच्या जवळ पोहोचला आहे. या सामन्यात तो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 72 वे शतक पूर्ण करू शकतो.
भारताच्या धावसंख्येने एक विकेट गमावून 250 धावा केल्या आहेत. इशान किशन आणि विराट कोहली यांच्यात 200 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. किशन दुहेरी शतकाच्या जवळ आहे. बांगलादेशविरुद्ध सर्वात मोठी खेळी खेळणारा तो भारतीय फलंदाज बनला आहे. भारताने 31 षटकात एका विकेटवर 257 धावा केल्या आहेत.
इशान किशनची वेगवान फलंदाजी सुरूच आहे. इशान किशनने आपल्या 150 धावा पूर्ण केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 16 चौकार आणि 8 षटकार मारले आहेत. ईशानने 150 धावा करण्यासाठी 103 चेंडू घेतले आहेत. 28 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 217 आहे. आता कोहली आणि ईशानची द्विशतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे.
विराट कोहलीनेही फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे, त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. कोहलीने 54 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले ज्यामध्ये चार चौकारांचा समावेश होता.
इशान किशनने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने 85 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. रोहितच्या जागी आलेल्या किशनने शानदार फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत 15 चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने 24 षटकात 162 धावा केल्या आहेत.
इशान किशन आणि विराट कोहली यांनी शानदार भागीदारी केली आहे. विराट एका टोकाशी खेळत आहे. त्याचवेळी इशान किशन वेगाने धावा करत आहे. या दोघांनी मिळून एक विकेट गमावून भारताची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली आहे. भारताने 18 षटकात एका विकेटवर 110 धावा केल्या आहेत.
इशान किशनला बऱ्याच दिवसांनी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवला. रोहितच्या जागी आलेल्या किशनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. सुरुवातीला आपला वेळ घेणाऱ्या किशनने इबादत हसनच्या षटकात १८ धावा केल्या. त्याने 49 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 73 अशी आहे.
भारतीय डावातील 12 षटके पूर्ण झाली आहेत. यावेळी भारताची धावसंख्या एका विकेटवर 68 धावा आहे. इशान किशन 49 आणि विराट कोहली 11 धावांवर खेळत आहे. ईशानने आतापर्यंतच्या खेळीत पाच चौकार मारले आहेत. त्याचवेळी विराट कोहलीही चौकार मारून खेळत आहे.
भारताची पहिली विकेट पडली आहे. शिखर धवन बाद झाला. मेहदी हसन मिराजने धवनला एलबीडब्ल्यू आऊट केले. धवनला केवळ तीन धावा करता आल्या. भारताची धावसंख्या 5 षटकांनंतर एका विकेटवर 17 धावा आहे.
शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मा आणि दीपक चहर या सामन्यातून बाहेर पडले. त्यांच्या जागी ईशान किशन आणि कुलदीप यादवला संधी मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.