Rohit Sharma: मालिका गमावल्यानंतर कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडले पराभवाचे खापर

कॅप्टन रोहितच्या राडावर आता हे खेळाडू....
Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

Rohit Sharma India vs Bangladesh ODI Series : भारतीय संघाने बांगलादेश दौऱ्यावर सलग दुसरी वनडे मालिका गमावला आहे. यापूर्वी 2015 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका गमावली होती. आता यजमान बांगलादेशने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाविरुद्ध 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा सामना आता 10 डिसेंबरला खेळल्या जाणार आहे. मात्र या तिसऱ्या वनडेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन तिघेही दुखापतीमुळे बाहेर आहेत.

Rohit Sharma
IND vs BAN: मालिका तर गेली अन् टीम इंडियाला मिळाले रोहितसह तीन मोठे धक्के!

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माला टीम इंडियाच्या गोलंदाजीवर सर्वाधिक राग व्यक्त केला. त्याने या पराभवाला जबाबदार धरत भारतीय संघाने गोलंदाजीत चांगली सुरुवात केल्याचे सांगितले. 69 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या, पण नंतर मधल्या षटकांत आणि शेवटी गोलंदाजांनी निराशा केली.

सामन्यानंतर रोहित म्हणाला की, 'ही अंगठ्याची दुखापत अजिबात चांगली नाही. पण एक गोष्ट म्हणजे फ्रॅक्चर नाही. यामुळेच मला फलंदाजी करता आली. जेव्हा तुम्ही सामना हरता तेव्हा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी असतात. बांगलादेश 69/6 वरून 270 धावा करू दिल्याने आमच्या गोलंदाजांची कमतरता दिसून आली. आमची सुरुवात चांगली झाली होती, पण मधल्या षटकांमध्ये आणि शेवटी थोडी निराशा झाली. गेल्या सामन्यातही असेच काहीसे घडले होते. यावर काम करायला हवे.

Rohit Sharma
Rohit Sharma : रोहित मुंबईत परतणार! प्रशिक्षक राहुल द्रविडने दिली दुखापतीवर अपटेड

तो पुढे म्हणाला की, मेहिदी हसन आणि महमुदुल्लाह यांनी उत्तम भागीदारी केली, पण अशी भागीदारी तोडण्याचा मार्गही शोधावा लागेल. जेव्हा तुम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये भागीदारी बनवता तेव्हा ती मॅच विनिंग पार्टनरशिपमध्ये बदलते आणि त्याने तेच केले. मधल्या फळीतही धैर्य दाखवण्याची गरज आहे. काही दुखापतींबाबत निश्चितच तणाव आहे आणि त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.