Ind Vs Bangladesh : भारताचा आजचा बांग्लादेशविरुद्धचा सामना भलताच रंगतदार झाल्याचे दिसून आले. भारताच्या आतापर्यत जेवढ्या मॅचेस झाल्या त्या सर्वच चुरशीच्या झाल्या आहेत. नेदरलँडचीही मॅचही चांगलीच झाली होती. बांग्लादेशपुढे भारतीय संघ कागदावर तर सव्वाशेरच होता. प्रत्यक्षात मैदानावर काय झाले हे सर्वांनी पाहिलं आहे. आज केएल राहुलला गवसलेला सूर ही जमेची बाजू म्हणता येईल. बाकी पुन्हा एकदा विराटनं आपल्याशिवाय कुणी खेळत नसल्याचे दाखवून दिले आहे.
बांग्लादेशला आपण सहज ढेर करु असे भारतीय संघाला वाटणाऱ्या अतिआत्मविश्वासामुळे मोठा फटका बसला असता मात्र तो थोडक्यात हुकल्याचे दिसून आले आहे. वास्तविक भारतीय संघाचा स्कोअर काही वाईट नव्हता. मात्र गोलंदाजांना बराच संघर्ष करावा लागला. बांग्लादेशचे फलंदाज भारतीय गोलंदाजीवर चांगलाच हल्ला करत होते. शेवटी मॅच सात धावांवर येऊन संपली. याचाच अर्थ असा की, भारताला बांग्लादेशनं काही सहजासहजी विजय मिळवून दिलेला नाही.
सोशल मीडियावर भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला जात असला तरी दुसरीकडे भारतीय संघाला ट्रोलही केले जात आहे. आजच्या विजयानं फारसं हुरळून जाण्याची काही गरज नाहीये. तुमचा वर्ल्ड कपमधील प्रवास अजुन अवघड असणारेय. त्यामुळे आणखी तयारी करायला हवा. असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. आजच्या सामन्यात भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मानं पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केल्याचे दिसून आले आहे. नेदरलँडचा सामना वगळता तो एकागी सामन्यात खेळलेला नाही.
भारतीय गोलंदाजीवर देखील नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. भलेही आजच्या सामन्यात हार्दिक पांड्यानं प्रभावी गोलंदाजी केली असली तरी ज्या प्रमुख गोलंदाजावर संघाची मदार आहे त्यांनी निराशा केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. बांग्लादेशचा संघ हा विजयानंतर नागीण डान्स करुन सेलिब्रेशन करण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वी भारतीय संघाच्या विरोधात जेव्हा बांग्लादेशनं विजय मिळवला तेव्हा ते दिसून आले आहे. आजचा डान्स मात्र थोडक्यात हुकला. असं असलं तरी रोहितच्या टीमला बांग्लादेशनं नक्कीच रडकुंडीला आणले होते. हे मान्य करावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.