Ind vs Ban Test: BCCI ऋषभ पंतचे पंख छाटतय; ODI झालं आता कसोटीतही टांगती तलवार?

India vs Bangladesh Test Series
India vs Bangladesh Test Series
Updated on

India vs Bangladesh Test Series : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार नाही. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितला दुखापत झाली होती. यानंतर तो भारतात परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार केएल राहुलची बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर राहुलने कसोटीतही संघाचे नेतृत्व केले आहे.

India vs Bangladesh Test Series
FIFA WC22 : आता उपांत्य फेरीचा थरार! तीन खंडातील देशांमध्ये फायनलसाठी चुरस

रोहित शर्माला वगळल्यानंतर बीसीसीआयने या दौऱ्यासाठी पुन्हा खेळाडूंची लिस्ट शेअर केली आहे. यामध्ये अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला खराब फॉर्ममुळे पुजाराला संघातून वगळण्यात आले होते. तो इंग्लंड दौऱ्यावर परतला आणि एका सामन्यानंतर त्याला उपकर्णधार बनवण्यात आले. 96 कसोटी खेळलेल्या पुजाराला अद्याप एकाही सामन्यात संघाचे नेतृत्व केले नाही. याआधीही तो काही वेळा संघाचा उपकर्णधार होता.

India vs Bangladesh Test Series
IndW vs AusW: स्मृतीचा सुपर ओव्हरमध्ये धडाका! भारताचा थरारक विजय

भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी खेळला होता. कर्णधार रोहित शर्माला कोरोना झाला होता. केएल राहुल दुखापतीमुळे या दौऱ्यात सहभागी झाला नव्हता. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचबरोबर युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पुजारा त्या संघात होता पण त्याची निवड झाली नाही. त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेतही पंत संघाचा कर्णधार होता. आता टी-20 मध्ये रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीत हार्दिक कर्णधारपद भूषवत आहे. यासोबतच कसोटी उपकर्णधारपदही पंतच्या हातातून निसटले आहे. त्याच्या वनडे आणि टी-20 संघातील उपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

India vs Bangladesh Test Series
IND vs BAN: पहिल्या टेस्टमधून कॅप्टन रोहित बाहेर! BCCI ने शमी-जडेजाबद्दल दिले मोठे अपडेट

भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()