Ind vs Ban : कोहलीचे शतक पूर्ण व्हावे, म्हणूनच अंपायरने दिला चुकीचा निर्णय? जाणून घ्या काय आहे ICC चा नियम

Ind vs Ban : कोहलीचे शतक पूर्ण व्हावे, म्हणूनच अंपायरने दिला चुकीचा निर्णय? जाणून घ्या काय आहे ICC चा नियम
Updated on

IND Vs BAN Umpire Kettleborough Refuses Ball Wide Virat Kohli : 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने बांगलादेशचा पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक झळकावले. मात्र, त्याच्या शतकादरम्यान या सामन्याचे मैदानावरील पंच रिचर्ड कॅटलबरो चर्चेत आले. विराटच्या शतकापूर्वी पंच रिचर्ड केटलबरो यांनी एक निर्णय दिला ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अंपायरने चुकीचा निर्णय दिला का?

या सामन्यात विराट कोहलीने 97 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 103 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली 97 धावा करून खेळत होता. भारताला विजयासाठी 2 धावांची गरज होती आणि त्याला शतक करण्यासाठी तीन धावांची गरज होती.

त्यानंतर फिरकीपटू नसुम अहमदने विराट कोहलीला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर फेकला. पण लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला पंच रिचर्ड केटलबरो यांनी वाईड दिले नाही. त्यांच्या या निर्णयावर आता खळबळ उडाली आहे.

मात्र, या निर्णयामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. काही या निर्णयाच्या बाजूने तर काही या निर्णयाच्या विरोधात आहेत. याबाबत नियम काय म्हणतात ते जाणून घेऊया...

मेरीलेबोन क्रिकेट क्लब क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था आहे. आणि वाइडबाबत अनेक नियम आहेत. MCC च्या कलम 22.1.1 नुसार, जेव्हा चेंडू फलंदाजाच्या मागून जातो, तेव्हा तो वाईड घोषित केला जातो. पण बॉल वाइड घोषित करण्यापूर्वी मैदानावर अंपायर शॉट दरम्यान फलंदाजाची स्थिती काय आहे देखील पाहतो.

उदारणार्थ, खेळताना जर फलंदाज त्याच्या जागेवरून हलताना दिसला आणि तरीही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला. तर अंपायर चेंडू फलंदाजाला लागला असता की नाही हे पाहतो. जर चेंडू त्याला लागत असेल तर तो वाइड घोषित केला जात नाही.

विराटबद्दल बोलायचे झाले तर, तो लेग स्टंपवर उभा होता आणि जेव्हा चेंडू फेकला गेला तेव्हा तो ऑफ स्टंपच्या दिशेने गेला. अंपायर केटलबरोच्या दृष्टिकोनातून, कोहली चेंडू खेळण्यासाठी त्याच्या जागेवरून हलला नसता तर चेंडू त्याच्या पायाला लागला असता. त्यामुळे अंपायरने त्याला वाईड घोषित केले नाही. अशा परिस्थितीत केटलबरोचा निर्णय योग्य होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.