IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरुद्ध यष्टिरक्षक म्हणून भरत-जुरेलमध्ये चुरस; के.एल राहुलचा पत्ता कट

IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत केएल राहुल यष्टिरक्षण करणार नाही. तो केवळ फलंदाज म्हणून खेळेल, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले.
IND vs ENG 1st Test
IND vs ENG 1st TestEsakal
Updated on

हैदराबाद: इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत केएल राहुल यष्टिरक्षण करणार नाही. तो केवळ फलंदाज म्हणून खेळेल, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यष्टिरक्षकासाठी के. एस. भरत आणि ध्रुव जुरेल यांच्यात स्पर्धा असेल. तसेच विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतल्यामुळे श्रेयस अय्यरचे अंतिम ११ मधील स्थान कायम राहू शकेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत राहुलने यष्टिरक्षण केले होते. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही ही जबाबदारी सांभाळेल, असे सांगितले जात होते; परंतु आज झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविड यांनी केएल राहुलबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली.

IND vs ENG 1st Test
India vs Syria AFC Asian Cup 2023 : भारतीय फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात! सीरियाकडून १-० असा पराभव

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेती संघरचनेसंदर्भात आम्ही स्पष्टता आणली आहे. राहुल यष्टिरक्षण करणार नाही. म्हणूनच आम्ही १५ खेळाडूंच्या संघात दोन यष्टिरक्षक निवडले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत राहुलने यष्टिरक्षणात चांगली कामगिरी बजावली होती, असे राहुल द्रविड म्हणाले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत परिस्थिती वेगळी असणार आहे. देशातील खेळपट्ट्या फिरकीस साथ देणाऱ्या असतील. त्यामुळे यष्टिरक्षकाला अश्विन, जडेजा आणि आणखी एका फिरकी गोलंदाज अशा तीन तीन फिरकी गोलंदांसमोर यष्टिरक्षण करावे लागेल. यष्टिरक्षकावर अधिक ताण येऊ शकतो.

IND vs ENG 1st Test
Australian Open 2024 : गतविजेता जोकोविच ११व्यांदा उपांत्य फेरीत! टेलर फ्रिटझ्‌वर चार सेटमध्ये विजय

विराटमुळे श्रेयस अय्यरला संधी

राहुलला केवळ फलंदाज म्हणून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे वेगळ्या यष्टिरक्षकाची निवड केली जाईल. पाच गोलंदाज आणि रोहित, यशस्वी, गिल, विराट, राहुल आणि यष्टिरक्षक असे सहा फलंदाज झाले असते. त्यामुळे श्रेयस अय्यरला वगळण्यात आले असते. आता विराट नसल्यामुळे श्रेयसला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.