Ind vs Eng : हैदराबाद, दुसरा डाव अन् द्विशतक... ओली पोपचे कोचच्या पावलावर पाऊल

India vs England Test Series News 2024
Ind Vs Eng 1st Test Ollie Pope Misses Double Century Brendon Mccullum Record
Ind Vs Eng 1st Test Ollie Pope Misses Double Century Brendon Mccullum Record
Updated on

India vs England Test Series :

हैदराबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ 246 धावांवर ऑल आऊट झाला. यानंतर हैदराबाद कसोटी सामना चौथ्या दिवशी जाईल, असे कोणाला वाटले नव्हते.

Ind Vs Eng 1st Test Ollie Pope Misses Double Century Brendon Mccullum Record
Ollie Pope IND vs ENG : इंग्लंडच्या उपकर्णधाराने पारडं झुकवलं; पोपमुळे जिंकणारा भारत आलाय टेन्शनमध्ये

पण इंग्लंड संघाने भारताला 231 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले होते. ब्रिटिशांच्या या चमकदार कामगिरीचे श्रेय ऑली पोपला जाते. पोपमुळे इंग्लंड या कसोटी सामन्यात जिवंत आहे. आणि हा कसोटी सामना आता कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. मात्र, ओली पोपचे द्विशतक हुकले, पण त्याने न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि इंग्लंडचा कोच ब्रेंडन मॅक्युलमच्या पावलावर पाऊल टाकले.

Ind Vs Eng 1st Test Ollie Pope Misses Double Century Brendon Mccullum Record
Video : 6,6,6,6,4,6.... एका षटकात ठोकल्या 34 धावा अन् 13 चेंडूत तुफानी अर्धशतक! द. आफ्रिकेला मिळाला नवा एबी डिव्हिलियर्स

ऑली पोपला भारताच्या दुसऱ्या डावात परदेशी फलंदाज म्हणून सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम करण्याची संधी होती. यासाठी त्याला 232 पेक्षा जास्त धावा करायच्या होत्या. कारण झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरने नागपुरात नाबाद 232 धावा केल्या होत्या.

ब्रेंडन मॅक्क्युलम या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2010 मध्ये हैदराबादमध्येच 225 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या गारफिल्ड सोबर्सने 1958 मध्ये कानपूरमध्ये 198 धावांची इनिंग खेळली होती. पोपने पाकिस्तानच्या सईद अन्वरला मागे टाकले. त्याने 1999 मध्ये कोलकाता येथे 188 धावांची नाबाद खेळी खेळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.