Video: मराठमोळ्या शार्दूलने इंग्लंडच्या कर्णधाराला गुंडाळलं...

Video: मराठमोळ्या शार्दूलने इंग्लंडच्या कर्णधाराला गुंडाळलं... शार्दूल ठाकूरने टाकलेला चेंडू स्विंग झाला अन् जो रूट अवाक झाला Ind vs Eng 1st Test Video Mumbai Cricketer Shardul Thakur swings and dismisses Captain Joe Root vjb 91
Shardul-Thakur-Joe-Root-LBW
Shardul-Thakur-Joe-Root-LBW
Updated on

शार्दूल ठाकूरने टाकलेला चेंडू स्विंग झाला अन् जो रूट अवाक झाला

Ind vs Eng 1st Test: भारतीय संघाच्या वेगवान माऱ्यापुढे यजमान इंग्लंडचा पहिला डाव अचानक गडगडला. जसप्रीत बुमराहच्या ४, मोहम्मद शमीच्या ३, शार्दूल ठाकूरच्या २ तर मोहम्मद सिराजच्या एका बळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला दोनशेच्या आतच रोखले. कर्णधार जो रूटच्या दमदार अर्धशतकी खेळीला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळू शकली नाही. क्रॉलीच्या २७, बेअरस्टोच्या २९ आणि सॅम करनच्या नाबाद २७ धावांमुळे इंग्लंडला दीडशेपार मजल मारता आली. पण पहिल्या डावात मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने कर्णधार रूटचा अडसर दूर करणारा क्षण विशेष ठरला.

Shardul-Thakur-Joe-Root-LBW
Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

इंग्लंडचा संघ संयमी खेळी करत होता. अर्धशतक पूर्ण करून जो रूट आपला डाव पुढे नेत होता. वरच्या फळीतील फलंदाजांनी साथ दिली नसली तरी रूटने एकहाती खिंड लढवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे तो अतिशय सावधपणे खेळ करत होता. पण अखेर शार्दूल ठाकूरने त्याचा अडसर दूर केला. शार्दूलने अगदी रूटच्या पायासमोर टप्पा टाकला. चेंडू बाहेरच्या दिशेला जाईल असं समजून रूटने बॅट फिरवली पण चेंडू पटकन स्विंग झाला. चेंडू पायावर कसा आदळला हे काही क्षण रूटलाही कळलं नाही. तो अवाक झाला पण अंपायरने मात्र आपली भूमिका चोख बजावली. पंचांनी त्याला बाद ठरवल्यावर इंग्लंडने DRS घेतला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

शार्दूलच्या स्विंगपुढे जो रूट बाद, पाहा Video -

Shardul-Thakur-Joe-Root-LBW
भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं म्हणजे... -गंभीर

असा रंगला पहिला डाव-

टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्यात षटकात धक्का बसला. बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर क्रॉली आणि सिबलीने अर्धशतकी भागीदारी केली. पण क्रॉली २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिबलीदेखील १८ धावांवर माघारी परतला. बेअरस्टोने काही काळ रूटची साथ दिली पण तो २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर झटपट गडी बाद होत गेले. सॅम करनने काही काळ झुंज दिली. पण त्याला दुसरीकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे संघाचा डाव १८३ धावांमध्ये आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.