भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 6 बाद 336 धावांपर्यंत मजल मारली. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने नाबाद 179 धावा ठोकत भारताला चांगल्या स्थितीत पोहचवले. भारताकडून यशस्वीनंतर शुभमन गिलने 34 तर रजत पाटीदारने 32 धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीर आणि रेहान अहमदने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 बाद 336 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने नाबाद 179 धावा केल्या. मात्र शेवटच्या काही षटकात अक्षर पटेल आणि केसी भरत हे झालबाद झाले.
पहिला दिवस संपण्यासाठी फक्त 5 षटके शिल्लक असताना अक्षर पटेल बाद झाला. 27 धावांवर असताना शोएब बशीरने त्याला झेलबाद केले.
यशस्वी जैस्वालने पहिल्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. अय्यरसोबत 90 तर पाटीदारसोबत 70 धावांची भागीदारी रचल्यानंतर आता यशस्वीने अक्षर पटेलसोबतही नाबाद अर्दशतकी भागीदारी रचली. भारताने पहिल्या दिवशीच 300 धावांचा टप्पा पार केला.
यशस्वी जैस्वालने 150 धावा पूर्ण केल्या आहेत. भारताने सध्या चार गड्यांच्या मोबदल्यात 272 धावा केल्या आहेत. यशस्वी 151 धावा करून आणि अक्षर पटेल 13 धावा करून क्रीजवर आहे.
पदार्पणात चांगली खेळी खेळताना दिसणारा रजत पाटीदार (32) बोल्ड झाला. रेहान अहमदने त्याला आपला शिकार बनवले.
चहापानानंतर यशस्वी जैस्वाल आणि रजत पाटीदारने चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चहापानापर्यंत 3 बाद 225 धावांपर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 125 धावा करून नाबाद आहे तर त्याला त्याला साथ देणारा रजत पाटीदार हा 25 धावांवर खेळत आहे.
यशस्वी जयस्वालने षटकार मारत शतक ठोकलं. त्याने श्रेयस अय्यर सोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी देखील रचली. मात्र टॉम हार्टलीने 59 चेंडूत 27 धावा करणाऱ्या अय्यरला बाद करत ही जोडी फोडली. अय्यर बाद झाला त्यावेळी भारताच्या 3 बाद 179 धावा झाल्या होत्या.
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने आपले कसोटीमधील दुसरे शतक ठोकले. त्याने षटकार मारत दिमाखात आपलं शतक 152 चेंडूत पूर्ण केलं. त्याने अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी रचली.
यशस्वी आणि श्रेयस यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी 86 आणि श्रेयस 21 धावांसह खेळत आहेत. यशस्वी शतकाकडे वाटचाल. गेल्या सामन्यात तो चुकला होता.
लंचनंतरचा खेळ सुरू झाला. भारतीय संघाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 100 धावांच्या पुढे आहे. यशस्वी आणि श्रेयस क्रीजवर आहेत. दोघेही टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील.
पहिल्या दिवशी लंचपर्यंत भारताने पहिल्या डावात दोन गडी गमावून 103 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल 51 धावा करून आणि श्रेयस अय्यर 4 धावा करून खेळत आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित 14 धावा करून बाद झाला. त्याला नवोदित शोएब बशीरने झेलबाद केले. त्यानंतर यशस्वीने शुभमन गिलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली.
मात्र, गिल मोठी खेळी खेळू शकला नाही, जेम्स अँडरसनने त्याला आऊट केले. शुभमन पाच चौकारांच्या मदतीने 34 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर तो सातत्याने अपयशी ठरत आहे.
यशस्वी जैस्वालने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. जैस्वालने 89 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारताला दुसरा धक्का 89 धावांवर बसला आहे. जेम्स अँडरसनने शुभमन गिलला झेलबाद केले. त्याला 46 चेंडूत 34 धावा करता आल्या. गिलने डावाची सुरुवात चांगली केली आणि पाच चौकार मारले, पण अँडरसनसमोर त्याला अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी चेंडू शुभमनच्या बॅटची कड घेऊन विकेटकीपरच्या हातात गेला.
28 षटकांनंतर भारताने 1 गडी गमावून 85 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल (41 धावा) आणि शुभमन गिल (30 धावा) क्रीजवर आहेत.
टीम इंडियाने 18 व्या षटकात पहिली विकेट गमावली आहे. पदार्पण करणारा फिरकी गोलंदाज शोएब बशीरने रोहित शर्माची विकेट घेतली आहे.
सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा टीम इंडियाला सुरेख सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघाने 10 षटकात 23 धावा केल्या आहेत. संघात पुनरागमन करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने तगडी गोलंदाजी करत आहे.
भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा सलामीला आले आहेत. जेम्स अँडरसनने पहिले षटक टाकले. त्याने फक्त एक धाव दिली. दुसऱ्या षटकात जो रूटला यशस्वी जैस्वाल दोन चौकार मारले.
रजत पाटीदार कसोटी पदार्पण करत आहे. केएल राहुलच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ केवळ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर आहेत.
त्याचबरोबर मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. जडेजाच्या जागी कुलदीप, राहुलच्या जागी रजत पाटीदार आणि सिराजच्या जागी मुकेश कुमार खेळत असल्याचे कर्णधार रोहितने सांगितले.
हिल्या डावात तब्बल १९० धावांची आघाडी घेऊनही पराभवाची नामुष्की ओढवून घेतल्यामुळे भारतीय संघाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे....
भारत-इंग्लंड कसोटी मालिका
दुसरी कसोटी ः ठिकाण ः विशाखापट्टणम
वेळ ः सकाळी ९.३० पासून
थेट प्रक्षेपण ः जिओ सिनेमा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.