"राहुलला संघात घेणारच नव्हतो पण.."; रोहितने सांगितला किस्सा

"राहुलला कसोटी संघात संधी मिळणारच नव्हती पण..."; रोहितने सांगितला रंजक किस्सा राहुलने पहिल्याच दिवशी ठोकलं दमदार शतक Ind vs Eng 2nd Test at Lords KL Rahul was not supposed to Play in Test Team but he got chance says Rohit Sharma vjb 91
Rohit-Rahul
Rohit-Rahul
Updated on

राहुलने पहिल्याच दिवशी ठोकलं दमदार शतक

Ind vs Eng Day 1: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ३ गड्यांच्या मोबदल्यात २७६ धावांपर्यंत मजल मारली. लोकेश राहुलचे धडाकेबाज शतक आणि रोहित शर्माच्या दमदार ८३ धावांच्या बळावर भारताने ही मजल मारली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत लोकेश राहुल नाबाद राहिला आणि त्याने १२७ धावांची दमदार खेळी केली. राहुलबद्दल रोहितने कौतुकोद्गार काढलेच पण त्यासोबतच एक रंजक किस्साही सांगितला.

Rohit-Rahul
IND vs ENG: राहुलचं धडाकेबाज शतक, 'हिटमॅन'चाही अर्धशतकी दणका!

"राहुल हा कसोटी संघात खेळेल अशी जराशीही शक्यता नव्हती. आम्ही राहुलला संघात घेणारच नव्हतो. कारण राहुलच्या खेळाची चर्चाच झाली नव्हती. मयंक अग्रवालला आम्ही सलामीवीर म्हणून संघात घेतलं होतं. पण दुर्दैवाने मयंकच्या डोक्याला चेंडू लागला आणि संघाबाहेर झाला. त्यामुळे राहुलचा विचार झाला आणि त्याला संघात स्थान दिले", असा किस्सा रोहितने सांगितला.

राहुलच्या दमदार शतकाचीही त्याने स्तुती केली. रोहित म्हणाला, "मी राहुलला यापेक्षा अप्रितम फलंदाजी करताना या आधी कधीच पाहिलेला नव्हता. राहुलने पहिल्या चेंडूपासूनच स्वत:ला बांधून ठेवलं होतं. त्याचे खेळावर पूर्ण नियंत्रण होते. एकाही चेंडूवर तो चुकला नाही किंवा बाचकला नाही. त्याने पहिल्या चेंडूपासूनच स्वत:ची ठरलेली खेळी केली आणि त्याचा परिणाम सगळ्यांच्या समोर स्पष्टपणे दिसतोय."

Rohit-Rahul
IND vs ENG: कोहली भाऊ, तुमचं चाललंय काय? नेटकरी विराटवर भडकले

"राहुलच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर मी फक्त एवढंच सांगू शकेन की सामन्याचा पहिला दिवस हा त्याचाच होता. त्याने त्या दिवसाचा पूरेपूर उपयोग केला. त्याने डोक्यात ठरवून ठेवलेल्या योजनांबद्दल तो पूर्णपणे स्पष्ट होता. त्यामुळे तो अजिबात गोंधळला नाही. जेव्हा तुमच्या प्लॅनवर विश्वास ठेवता आणि तसे वागता त्यावेळी नक्कीच तुम्हाला हवे असलेले निकाल हाती येतात", अशा शब्दात रोहितने राहुलवर स्तुतिसुमने उधलली.

पहिल्या दिवसाच्या खेळात काय घडलं?

टॉस हारल्यानंतर भारताचा संघ फलंदाजीसाठी आला. रोहित शर्माने आपला आक्रमक खेळ सुरू करत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. रोहितने ८३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण ८३ धावांवर असताना रोहित क्लीन बोल्ड झाला. रोहितने ११ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर पुजारा ९ धावांवर बाद झाला. पण विराटने चांगली खेळी केली. चांगली सुरूवात मिळालेली असताना ४२ धावांवर तो माघारी परतला. पण राहुलने एक बाजू लावून धरत आपले शतक पूर्ण केले आणि संघाला २७६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.