IND vs ENG: रोहितचं शतक हुकलं पण सोशल मिडियावर त्याचीच चर्चा

IND vs ENG: रोहितचं शतक हुकलं पण सोशल मिडियावर त्याचीच चर्चा रोहितने इंग्लंडमध्ये ठोकलं पहिलंवहिलं अर्धशतक Ind vs Eng 2nd Test at Lords Rohit Sharma misses century against England but praises all over on twitter vjb 91
Rohit Sharma
Rohit SharmaE sakal
Updated on

रोहितने इंग्लंडमध्ये ठोकलं पहिलंवहिलं अर्धशतक

Ind vs Eng 2nd Test at Lords: भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. नाणेफेक हारल्यावर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी दमदार शतकी भागीदारी केली. २०१७नंतर ही भारताची परदेशी भूमीवर पहिलीच शतकी सलामी ठरली. रोहितने दमदार खेळी करत अर्धशतक ठोकले पण त्याला शतक ठोकता आले नाही. शतकाच्या दिशेने आगेकूच करताना त्याला त्रिफळाचीत व्हावे लागले. रोहितचं शतक हुकलं असलं तरी त्याचा सोशल मिडियावर बोलबोला दिसून आला.

Rohit Sharma
IND vs ENG: रोहित-राहुलचा धमाका! 4 वर्षांनी केली खास कामगिरी

भारताकडून खेळताना रोहित शर्माने शानदार असे अर्धशतक ठोकले. रोहित शर्माने डावाच्या सुरुवातीपासून खराब चेंडूवर फटकेबाजी करण्याचा पवित्रा घेतला होता. चांगला किंवा स्विंग येणारा चेंडू आला तर तो सोडून द्यायचा पण खराब चेंडू आला तर त्यावर नक्कीच चौकार खेचायचा अशी त्याची भूमिका होती. त्यामुळे रोहितला इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेता आला. पावसाचा व्यत्यय आला तरीही रोहितने चांगला खेळ सुरूच ठेवला आणि कसोटी क्रिकेटमधील आपले १३वे अर्धशतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम रोहितने पहिल्यांदजाच केला. रोहित गेल्या काही सामन्यात ३० पेक्षा जास्त धावा करत होता पण त्याला अर्धशतक ठोकणे शक्य होत नव्हते. या सामन्यात मात्र त्याने हा पराक्रम करून दाखवला. मात्र तो शतकानजीक असताना ८३ धावांवर बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला आत स्विंग होणाऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड केले.

Rohit Sharma
IND vs ENG: रोहितचे अर्धशतक! पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

रोहितने १४५ चेंडूंचा सामना केला. त्या खेळीत त्याने ८३ धावा कुटल्या. रोहितने आपल्या खेळीमध्ये तब्बल ११ चौकार खेचले. त्यासोबतच एका उसळत्या चेंडूवर रोहितने एक षटकारही लगावला. पण त्याला शतक झळकावता आला नाही. अँडरसनचा चेंडू त्याला कळला नाही आणि तो त्रिफळाचीत झाला.

रोहित-राहुल जोडीचा मोठा पराक्रम

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी ३३व्या षटकात भारतीय संघाला शतक गाठून दिलं. रोहित-राहुल जोडीने भारतासाठी शतकी सलामी देत अतिशय खास अशी कामगिरी केली. भारतीय संघाकडून २०१७नंतर कोणत्याही सलामी जोडीला शतकी भागीदारी करता आली नव्हती. पहिल्या कसोटीत राहुल-रोहित जोडीने ९७ धावांची भागीदारी केली होती. पण त्यानंतर रोहितला बाद व्हावे लागले. या सामन्याच्या पहिल्या डावात मात्र या दोघांनी अप्रतिम खेळ केला आणि तब्बल चार वर्षांनी परदेशी जमिनीवर शतकी कसोटी सलामी देण्याची खास कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.