IND vs ENG: जाफरने भन्नाट मीम शेअर करत उडवली इंग्लंडची खिल्ली

England-Troll
England-Troll
Updated on

बुमराह आणि इंग्लंडचे गोलंदाज मैदानावरच एकमेकांना भिडले

Ind vs Eng 2nd Test Day 5: भारतीय संघाने दुसऱ्या डावात झटपट तीन बळी गमावल्यानंतर पुजारा-रहाणे जोडीने डावाला आकार दिला. त्या दोघांनंतर पाचव्या दिवसाच्या खेळात ऋषभ पंत फारच लवकर बाज झाला. पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने वाकडेतिकडे फटके मारत चांगली भागीदारी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी बुमराहवर बाऊन्सरचा मारा केला. त्यातून बुमराह आणि इंग्लंडच्या गोलंदाजांची बाचाबाची झाली. याच मुद्द्यावर एक भन्नाट मीम शेअर करत मुंबईकर रणजी किंग वसीम जाफर याने इंग्लंडला ट्रोल केल.

England-Troll
Video: आधी विराट भडकला, मग रोहित संतापला; पाहा नक्की काय झालं...

इंग्लंडच्या पहिल्या डावात जेव्हा अँडरसन फलंदाजी करण्यासाठी आला, तेव्हा बुमराहने त्याच्यावर बाऊन्सरचा मारा केला. परिणामी बुमराहवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी तेच शस्त्र उगारलं. पण बुमराहने चेंडू टोलवून लावले. त्यामुळे चिडलेले इंग्लंडचे खेळाडू बुमराहशी मैदानावर भिडले. त्यानंतर वसीम जाफरने एक मीम शेअर केले. बुमराहशी इंग्लंडचे गोलंदाज वाद घालत असल्याचे पाहून इंग्लंडचे फलंदाज म्हणत असतील की त्याला नका डिवचू, तो आमची वाट लावेल, अशा आशयाचे मीम जाफरने ट्विट केले.

England-Troll
IND vs ENG: "तो तासभर जरी खेळला तरी गोलंदाजांना झेपणार नाही"

तत्पूर्वी, भारताच्या दुसऱ्या डावात राहुल ५ धावांवर, रोहित २१ धावांवर आणि विराट २० धावांवर बाद झाला. अखेर रहाणे-पुजारा जोडीने डाव सावरला. पुजाराने २०९ चेंडूत ४५ तर अजिंक्यने १४६ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांच्या नंतर जाडेजा पटकन बाद झाला. पण दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी खेळपट्टी सांभाळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()