क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेला यजमान इंग्लंड संघ पहिल्या दिवसाअखेर बॅकफूटवर दिसला. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करुन देत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटचा निर्णय व्यर्थ ठरवला. भारताच्या सलामी जोडीने शतकी भागीदारी करुन संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा मोठी खेळी करेल असे वाटत असताना जेम्स अँडरसनने त्याला त्रिफळाचित केले. दिवसाअखेर केएल राहुलने नाबाद शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.
केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी ज्यावेळी सेट झाली होती त्यावेळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या खेळात रोहित शर्मासाठी युवा लोकेश राहुलने दाखवलेली आदराची भावना चांगलीच चर्चेत आहे. पहिल्या सेशमध्ये ज्यावेळी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. ज्यावेळी ही जोडी ड्रेसिंग रुममध्ये चालली होती. सीमारेषेवर पोहचल्यानंतर रोहित शर्मा थोडा मागे असल्याचे दिसल्यामुळे केएल राहुलने आपली गती कमी केली.
रोहितला पहिल्यांदा सीमारेषा ओलांडता यावे म्हणून त्याने ही कृती केली. सीनियर खेळाडूला ज्याप्रकारे त्याने आदर दिला त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी रोहितची प्रतिक्रियाही बघण्याजोगी होती. राहुलची पावले अडखळताना दिसताच त्याने राहुलच्या पाठिवर हात ठेवत चल...रे सोबतच जाऊ, असा काही रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. या घटनेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा सर्व प्रकार घडला त्यावेळी भारताच्या धावफलकावर बिन बाद 46 धावा होत्या.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने बाद होण्यापूर्वी 83 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि एक षटकार खेचला. रोहितने मैदानात सोडल्यानंतर संयमी खेळी करणाऱ्या राहुलने गियर बदलला. त्याने पहिल्याच दिवशी 127 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या दिवशी या धावसंख्येत केवळ 2 धावांची भर घालून तो बाद झाला. या दोघांशिवाय कर्णधार विराट कोहलीने संघाच्या धावसंख्येत 42 धावांची भर घातली. पण तो मोठी खेळी करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.