IND vs ENG: राहुलचा इंग्लंडला दणका! विरूच्या विक्रमाशी बरोबरी

IND vs ENG: राहुलचा इंग्लंडचा दणका! विरूच्या विक्रमाशी बरोबरी राहुलने चौकार-षटकाराची बरसात करत केली १२९ धावांची खेळी Ind vs Eng 2nd Test Lords KL Rahul Century knock equals Virender Sehwag Record of 4 Tons outside Asia as Opener vjb 91
KL-Rahul-Sehwag
KL-Rahul-Sehwag
Updated on

राहुलने चौकार-षटकाराची बरसात करत केली १२९ धावांची खेळी

भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धडाकेबाज खेळी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढत त्याने दमदार शतक ठोकलं. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यावर त्याला केवळ दोनच धावांची भर घातला आली. राहुलने २५० चेंडूंचा सामना करत १२९ धावा केल्या. राहुलच्या खेळीत १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राहुलने दमदार कामगिरी करत माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

KL-Rahul-Sehwag
"राहुलला संघात घेणारच नव्हतो पण.."; रोहितने सांगितला किस्सा

राहुल आणि रोहित या दोघांनी भारतीय संघाला शतकी सलामी दिली. रोहित बाद होईपर्यंत राहुल अतिशय संयमाने खेळत होता. रोहित ११ चौकार आणि १ षटकार खेचत ८३ धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुलने डावाला गती दिली. झटपट धावा जमवत त्याने अर्धशतक आणि शतक गाठले. मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी राहुलला संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने केले. या शतकासह त्याने विरेंद्र सेहवागच्या कामगिरीशी बरोबरी केली. आशिया खंडाच्या बाहेर क्रिकेट खेळताना सलामीवीर म्हणून हे राहुलचे चौथे शतक ठरले. सेहवागनेदेखील आशियाबाहेर सलामीवीर म्हणून चार शतके ठोकली आहेत. त्यामुळे राहुलने या विक्रमाची बरोबरी केली. या यादीत भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर हे १५ शतकांसह अव्वल आहेत.

KL-Rahul-Sehwag
IND vs ENG: राहुलचं धडाकेबाज शतक, 'हिटमॅन'चाही अर्धशतकी दणका!

दमदार शतक झळकावल्यानंतरही राहुल फटकेबाजी करतच होता. इंग्लंडच्या गोलंदाजांना परिस्थितीचा फायदा मिळू नये यासाठी त्याने आक्रमक खेळ सुरू ठेवला. त्याचा फायदा त्याला झाला. झटपट धावा जमवत दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो नाबाद १२७ धावांपर्यंत पोहोचला. दुसऱ्या दिवसाच्या खेळात तो द्विशतक मारणार का याकडे साऱ्यांच्या नजरा होत्या, पण अवघ्या दोन धावांची भर घालून राहुल बाद झाला. ओली रॉबिन्सन याने राहुलला झेलबाद होण्यास भाग पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()