IND vs ENG: अँडरसनचा भारताला जोरदार 'पंच'; भारत सर्वबाद ३६४

IND vs ENG: अँडरसनचा भारताला जोरदार 'पंच'; भारत सर्वबाद ३६४ इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे गमावले ८८ धावांत ७ गडी Ind vs Eng 2nd Test Lords Live Updates James Anderson Five Wickets Haul restricts Team India KL Rahul Rohit Sharma Fight well with Bat vjb 91
Anderson-5-Wickets
Anderson-5-Wickets
Updated on

इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे गमावले ८८ धावांत ७ गडी

Ind vs Eng 2nd Test Lords: स्विंगचा बादशाह म्हणून अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने पुन्हा एकदा भारताच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. पहिल्या दिवशी दोन बळी टिपणाऱ्या अँडरसनने दुसऱ्या दिवशी आपलं पंचक पूर्ण केलं. तब्बल ३१व्यांदा त्याने एकाच डावात पाच बळी टिपण्याची किमया साधली. इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सामन्यावरील पकड गमावली. एकही फलंदाज आपली छाप पाडू शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव ३६४ धावांतच संपुष्टात आला. महत्त्वाचे म्हणजे भारताचे सातच फलंदाज केवळ ८८ धावांत माघारी परतले. इंग्लंडकडून अँडरसनने ५, रॉबिन्सन आणि वूडने २-२ तर मोईन अलीने १ बळी टिपला.

पहिल्या दिवशी खेळ ३ बाद २७६ धावांवर थांबला होता. तेथून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. पहिल्याच सत्रात भारताने चार गडी बाद होऊ दिले. अतिशय सुंदर फॉर्ममध्ये असणारा लोकेश राहुल फारशी चमक दाखवू शकला नाही. राहुलपाठोपाठ अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनीही आपल्या विकेट्स बहाल केल्या. त्यानंतर उपहाराची वेळ होईपर्यंत रविंद्र जाडेजा (३१) आणि इशांत शर्मा (०) यांनी खेळपट्टी सांभाळत संघाला ७ बाद ३४६ धावसंख्या गाठून दिली. पण उपहारानंतरही तीच गत पाहायला मिळाली. इशांत शर्मा (८) आणि जसप्रीत बुमराह दोघेही (०) लगेच माघारी परतले. त्यामुळे जाडेजानेही फटकेबाजी सुरू केली आणि त्यातच तो ४० धावांवर बाद झाला.

असा रंगला भारताचा पहिला डाव

नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी घेतली. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल दोघांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी शतकी सलामी दिली. पण रोहितला शतक ठोकता आले नाही. रोहित ८३ धावांवर बाद झाला. पुजाराही ९ धावा काढून माघारी परतला. विराटने चांगली सुरूवात केली, पण तोदेखील ४२ धावांवर बाद झाला. राहुलने मात्र एक बाजू लावून धरत १२९ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशीच्या खेळात आधी राहुल बाद झाला आणि मग रांगच लागली. अजिंक्य रहाणे १ धावेवर बाद झाला. जाडेजा आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पंत ५ चौकारांसह ३७ धावांवर, मोहम्मद शमी शून्यावर, इशांत शर्मा ८ धावांवर आणि जसप्रीत बुमराह शून्यावर लगेच माघारी परतला. अशा परिस्थितीत धावा जमवण्याच्या उद्देशाने जाडेजाने हवाई फटका खेळला पण त्यातच तो ४० धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ३६४ धावांवर आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.