Ind vs Eng Shubman Gill : गिलचे शुभ संकेत! तब्बल 13 डावांनंतर प्रिन्सची तळपली बॅट

India vs England Test Series News :
Ind vs Eng Shubman Gill marathi news
Ind vs Eng Shubman Gill marathi newssakal
Updated on

Ind vs Eng Shubman Gill : भारत आणि इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने 13 डावांनंतर पहिले अर्धशतक झळकावले. भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा तिसऱ्या दिवशीचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी 28 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली.

पण जेम्स अँडरसनने आधी रोहितला एका शानदार चेंडूने क्लीन बोल्ड केले, आणि त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा यशस्वीची विकेट घेतली. भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलसाठी हा सामना करो या मरो असा होता.

Ind vs Eng Shubman Gill marathi news
Virat Kohli : विराटला ब्रेक घेण्याचा झाला तोटा..? कसोटीत शतकांच्या रेसमध्ये पडला मागे

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गिलसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. कारण गेल्या 12 डावात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आले नव्हते. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो केवळ 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर गिलवर बरीच टीका होत होती आणि चाहते त्याला संघातून काढून टाकण्याची मागणी करत होते.

पण आता इंग्लंडविरुद्धच्या कठीण परिस्थितीत गिलचे हे अर्धशतक त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देणारे आहे. गिलचे हे अर्धशतक अवघ्या 52 चेंडूत झळकले. आता तो या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करेल अशी अपेक्षा आहे.

Ind vs Eng Shubman Gill marathi news
Shreyas Iyer IND vs ENG : आता निवड समिती बसेल अन्.... जहीरनं सांगितलं गिलच्या अर्धशतकानं अय्यरची झाली अडचण

13 डावात पहिले अर्धशतक

जेव्हापासून गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. तेव्हापासून तो सतत धावा काढण्यासाठी धडपडत होता. गिलने यापूर्वी खेळलेल्या 12 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. पण आता इंग्लंडविरुद्धचे हे अर्धशतक त्याला थोडा आत्मविश्वास देईल.

तत्पूर्वी, विशाखापट्टणममध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये युवा यशस्वी जैस्वालने भारताकडून शानदार द्विशतक झळकावले. भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव केवळ 253 धावांवर आटोपला. गोलंदाजीत भारताकडून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 बळी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()