IND vs ENG: कोहली भाऊ, तुमचं चाललंय काय? नेटकरी विराटवर भडकले

IND vs ENG: कोहली भाऊ, तुमचं चाललंय काय? नेटकरी विराटवर भडकले तुम्हाला माहिती आहे या संतापामागचं कारण, वाचा सविस्तर Ind vs Eng 2nd Test Virat Kohli Face anger trolling on Twitter as he excludes R Ashwin from Team India vjb 91
Virat Kohli
Virat Kohli Twitter
Updated on

Ind vs Eng 2nd Test: भारत विरूद्ध इंग्लंड पहिली कसोटी अनिर्णित राहिली. पावसाच्या व्यत्ययामुळे पाचव्या दिवसाचा खेळ झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या कसोटीआधी वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी कोणता खेळाडू संघात येणार अशी चर्चा सुरू होती. इंग्लंडने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी घेतली. विराटने टॉसनंतर टीम जाहीर करत इशांत शर्माला संघात स्थान दिल्याचे सांगितले. तेव्हापासून ट्वीटर आणि इतर सोशल मिडीयावर विराटविरूद्ध चांगलाच संताप दिसून आला.

Virat Kohli
Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

भारतीय संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरच्या जागी अनुभवी इशांत शर्माला संघात संधी मिळाली. बाकी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. शार्दूलला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या जागी अश्विनला संघात संधी मिळेल अशी आशा चाहत्यांना होती. पण ४ वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याचा भारतीय संघाचा फॉर्म्युला असल्याने अश्विनऐवजी इशांतला संघात स्थान मिळाले. त्यानंतर चाहत्यांनी विराट आणि रवी शास्त्री यांच्यावर चांगलाच रोष व्यक्त केला.

वाचा काही निवडक ट्विट्स-

Virat Kohli
शास्त्रींनंतर भारताचे नवे कोच कोण? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

भारताचा संपूर्ण संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज

इंग्लंडच्या संघात तीन महत्त्वाचे बदल

अनुभवी फिरकीपटू मोईन अली आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड या दोघांना संधी मिळाली. त्यासोबतच नवख्या हसीब हमीद यालाही स्थान मिळाले. डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक क्रॉली या तिघांना संघाबाहेर ठेवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()