Ind vs Eng : BCCI ची मोठी घोषणा! सामन्यातून हा खेळाडू अचानक बाहेर, सर्फराज खानला मिळाली संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम कसोटी सामना खेळला जात आहे...
IND vs ENG 2nd Test Why Shubman Gill
IND vs ENG 2nd Test Why Shubman Gillsakal
Updated on

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.

पण दुसऱ्या सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला दुखापत झाली आहे. विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वीच शुबमन गिल दिवसाच्या खेळात क्षेत्ररक्षण करू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

IND vs ENG 2nd Test Why Shubman Gill
FIFA World Cup 2026 schedule : 16 स्टेडियम, 104 सामने; अंतिम सामना अमेरिकेच्या या शहरात; जाणून घ्या वर्ल्ड कपचे शेड्यूल

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 255 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडला 399 धावांची मोठी धावसंख्या मिळाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताकडून शतक झळकावणारा शुभमन गिल चौथ्या दिवसाच्या खेळात मैदानात उतरला नाही. त्याच्यासाठी, बीसीसीआयने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले की, दुसऱ्या दिवसाच्या खेळात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करू शकणार नाही.

सर्फराजला मिळाली संधी

भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर निवडकर्त्यांनी दुसऱ्या सामन्यासाठी सर्फराज खानचा संघात समावेश केला. पहिल्यांदाच त्याची कसोटी संघात निवड झाल्यापासून त्याच्या पदार्पणाची चर्चा होती पण तसे झाले नाही. शुभमन गिलच्या दुखापतीमुळे त्याला विशाखापट्टणम कसोटीत मैदानात उतरण्याची संधी मिळाली. मैदानावरील अकरा खेळाडूंमध्ये सर्फराजचा समावेश होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर संघाने 396 धावा केल्या आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या 6 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 253 धावांवर आटोपला.

पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाकडे 143 धावांची आघाडी होती. दुस-या डावात शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले, भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()