IND vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का; आता फिरकी खेळपट्टीवर इंग्लंड कसं मॅनेज करणार?

IND vs ENG 3rd Test Jack Leach
IND vs ENG 3rd Test Jack Leach esakal
Updated on

IND vs ENG 3rd Test Jack Leach : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीपूर्वी पाहुण्या इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच संघातून बाहेर गेला असून तो दुखापतीमुळे संपूर्ण मलाकेला मुकला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून याची माहिती दिली. लिच भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत खेळला होता. लीच हा मायदेशात परतणार आहे.

IND vs ENG 3rd Test Jack Leach
IND vs ENG 3rd Test : पुस्तकावर धूळ साचली म्हणून... निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात लीचने इंग्लंडच्या विजयात दुखापतग्रस्त असूनही आपली भुमिका बजावली होती. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात एक एक विकेट घेतली होती. दरम्यान सामना सुरू असताना त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. आता तो पूर्ण मालिकेलाच मुकला आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटू महत्वाची भुमिका बजावतात. मात्र इंग्लंडचा अनुभवी लिचची उणीव इंग्लंडला पुढच्या तीन कसोटीत नक्कीच जाणवेल.

IND vs ENG 3rd Test Jack Leach
U19 World Cup 2024 : त्याचा शांत स्वभाव पाहता... अश्विनला उदय सहारनमध्ये दिसतो 'हा' स्टार भारतीय खेळाडू

लीच हा लवकरच मायदेशी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याच्या जागी कोणाला संधी देण्यात येणार हे अजून स्पष्ट केलेलं नाही. भारताने मालिकेतील दुसरा कसोटी सामना 106 धावांनी जिंकला होता. मालिका सध्या 1 - 1 अशी बरोबरीत आहे. 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये मालिकेलीत तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. ही खेळपट्टी फिरकीला पोषक मानली जाते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.