IND vs ENG: टीम इंडिया लीड्सच्या मैदानावर पोहोचली; पाहा फोटो

Team-India-Day-1
Team-India-Day-1
Updated on

BCCI ने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली माहिती

Ind vs Eng 3rd Test: मालिकेतील पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना दणदणीत १५१ धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने एकाकी झुंज दिली. पण भारताकडून मात्र सर्व खेळाडूंना खास खेळी केली. लय सापडत नसलेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनाही तिसऱ्या डावात सूर गवसला. पुजाराने ४५ तर अजिंक्यने ६१ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. आता तिसऱ्या कसोटी लीड्सच्या मैदानावर २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संघ आज लीड्सवर दाखल झाला. BCCI ने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. "नमस्कार, तुमचं सगळ्यांचं लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियममध्ये स्वागत आहे. इथेच मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे", असे ट्वीट BCCIने केले.

तिसऱ्या कसोटीसाठी संघात बदल होईल?

विराट कोहली आणि भारताच्या गोलंदाजांची फळी ही सध्या चांगल्या पद्धतीने खेळत आहे. त्यामुळे ते संघाबाहेर होणे शक्य नाही. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी संयमी आणि शानदार खेळी केली. त्यामुळे त्या दोघांपैकी कोणालाही वगळून सूर्यकुमारला संघात स्थान मिळणं जरा कठीणच आहे. त्याचसोबत पृथ्वी शॉ यालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर दमदार कामगिरी करत असल्याने त्याला संधी मिळणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे भारत स्वत:च्या संघात कोणताही बदल करेल असं वाटत नाही. भारत-इंग्लंड तिसरी कसोटी २५ ते २९ ऑगस्ट दरम्यान लीड्सच्या मैदानावर होणार आहे. इंग्लंडच्या संघाने डेव्हिड मलान आणि साकीब मेहमूद या दोघांना चमूत समाविष्ट करून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.