Ind vs Eng 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीची सुरूवात आजपासून होणार आहोती. पण ही कसोटी आजपासून सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली. BCCI शी आमची सुरू चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा पूर्ण झाल्यावरच पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करायचा की सामना पुढे ढकलायचा याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली होती. त्यानंतर काही वेळातच हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या गोटात आधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर फिजीओंना झालेल्या कोरोना संसर्गामुळे हा सामना रद्द करण्याची नामुष्की ओढवली.
पाचवी कसोटी नंतर कधी खेळवावी की काही वेगळा निर्णय घ्यायचा या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामतक मंडळ आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा सुरू आहे. भारताचे फिजिओ योगेश परमार हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले होते आणि सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली होती. त्यात साऱ्या खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सामना खेळण्यास संघातील काही प्रमुख खेळाडूंनी नकार दिला. परिणामी, BCCIने सामना पुढे ढकलण्याची विनंती केली. आता पाचव्या सामन्याबद्दल नक्की काय निर्णय घ्यायचा? याबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांची चर्चा सुरू आहे.
भारत-इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये गुरूवार आणि शुक्रवार या दिवसात अनेक बैठका झाल्या. त्यावेळी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कसोटी मालिकेतील पाचवा सामना कदाचित पुढील वर्षी खेळवण्यात येईल, असा अंदाज टीओआयने वर्तवला आहे. भारतीय संघ जुलै २०२२ मध्ये पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी कदाचित हा सामना खेळला जाईल असं म्हटलं जातंय. सध्या भारत मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. पण पाचवा सामना रद्द झाल्यानंतर आता भारतीय खेळाडूंनी आपला पसारा आवरण्यास सुरूवात केली असून ते लवकरच पुन्हा एकदा बायो-बबलमध्ये जाणार आहेत. IPL 2021साठी युएईला जाण्याआधी सर्व खेळाडूंना काही दिवस बायो-बबलमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.