Ind vs Eng : KL राहुल भारत सोडून गेला इंग्लंडला; पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर? जाणून घ्या कारण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सात मार्चपासून धरमशाला येथे खेळला जाणार आहे.
KL Rahul India vs England 5th Test Marathi News
KL Rahul India vs England 5th Test Marathi Newssakal
Updated on

KL Rahul India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सात मार्चपासून धरमशाला येथे खेळला जाणार आहे. यादरम्यान केएल राहुल सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. तो उपचारासाठी लंडनला गेले आहे. अशा स्थितीत पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो. मात्र, जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटी सामन्यासाठी परतणार आहे, त्याला चौथ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती.

KL Rahul India vs England 5th Test Marathi News
Shreyas Iyer : काल कर्णधार रोहित बोलला अन् आज श्रेयस अय्यरने घेतला मोठा निर्णय!

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, केएल राहुलला राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी 90 टक्के तंदुरुस्त मानले जात होते, परंतु चौथा कसोटी सामना संपल्यानंतरही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व्यवस्थापकांना त्याच्या दुखापतीचे पुनर्मूल्यांकन करावे लागले. त्यामुळे लंडनमधील एका तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी तो गेला आहे. उजव्या क्वाड्रिसेप्सला झालेल्या दुखापतीमुळे राहुल दुस-या कसोटीतून बाहेर पडला होता.

KL Rahul India vs England 5th Test Marathi News
Elena Norman : हॉकी इंडियात काम करताना कोंडी; एलिना नॉर्मन यांनी सीईओ पद सोडले

केएल राहुलवर गेल्या वर्षी झाली होती शस्त्रक्रिया

गेल्या वर्षी पण केएल राहुल त्याच्या उजव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखण्याशी झुंज देत होता, ज्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. इंग्लंडविरुद्धच्या तो मालिकेतील पहिला सामना खेळला होता. परंतु त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयने चौथ्या सामन्यापूर्वी एक अपडेट दिले होते की तो पाचव्या सामन्यात पुनरागमन करू शकतो, परंतु सध्या ते अवघड दिसत आहे.

या मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. पहिल्याच सामन्यात इंग्लंडने त्यांचा 28 धावांनी पराभव केला होता. पण या सामन्यानंतर टीम इंडियाने धमाकेदार पुनरागमन केले आणि सलग 3 सामने जिंकून मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()