बर्मिंगहॅम टेस्ट हारली तर टीम इंडियाचे मोठे नुकसान, ICC पॉईंट टेबलमध्ये...

बर्मिंगहॅममधला विजय भारतासाठी मालिका तसेच डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा.
ind vs eng
ind vs eng
Updated on

IND vs ENG : कर्णधार म्हणून रोहित शर्माला त्याच्या पहिल्या कसोटीत सामनात कठीण आव्हान मिळणार आहे. भारतीय संघ 1 ते 5 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. भारताला मालिका जिंकूण इतिहास रचण्याची संधी आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडकडून कसोटी हरल्यास टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमधून आपल्या तिसऱ्या स्थानवरून खाली येऊ शकतो.

ind vs eng
IND vs ENG: विराट कोहली खेळतो फुटबॉल, तर रोहित गाळतोय नेटमध्ये घाम

बर्मिंगहॅममधला विजय भारतासाठी मालिका तसेच डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. असे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड म्हटलं आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील भारताचे स्थान श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. भारत सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ind vs eng
OTD: आजच्याच दिवशी वेस्ट इंडिजनं घडवला होता इतिहास, 10 तास चालली मॅच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताची विजयाची टक्केवारी 58.33% आहे. श्रीलंका त्याचवेळी 55.56% आणि 40 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. घरच्या मैदानावर श्रीलंका जिंकला आणि भारत हरला, तर टक्केवारीच्या गुणांवर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर जाईल. जर भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेच्या निकालाची पर्वा न करता तो तिसऱ्या स्थानावर राहील. जर भारत जिंकला आणि श्रीलंका हरला, तर भारत WTC टेबलमध्ये आपले स्थान कायम ठेवेल तर ऑस्ट्रेलिया WTC मध्ये आपले स्थान मजबूत करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()