IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी यजमानांना मोठा धक्का

वूडच्या रुपात ज्यो रुट आणि इंग्लंड टीम व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला असून यातून सावरण्यासाठी ते कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Mark Wood
Mark WoodTwitter
Updated on

IND Vs ENG; Test Series 2021 : हेडिंग्ले लीड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज मार्क वूडने खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीतून माघार घेतलीये. (Mark Wood Ruled Out Of The Third Test) इंग्लंडच्या संघाला आधीच दुखापतीचं ग्रहण लागले आहे. जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिस वोक्स दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या दौऱ्याला मुकले असताना यात आता आणखी एक भर पडली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वूडच्या रुपात ज्यो रुट आणि इंग्लंड टीम व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला असून यातून सावरण्यासाठी ते कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रुटकडे वूडच्या जागी दोन पर्याय असतील. साबिक महमूद आणि क्रेथ ओव्हरटन यापैकी तो कोणावर विश्वास टाकणार हे पाहावे लागेल. तिसऱ्या कसोटी सामन्याला मार्क वूड मैदानात उतरणार नसल्यामुळे भारताला याचा मोठा फायदाच होईल.

Mark Wood
"जरा जाडा हो"; पाकिस्तानी क्रिकेटरचा हार्दिक पांड्याला सल्ला

स्टुअर्ट ब्रॉडने मालिकेतून माघार घेतल्यानंतर मार्क वूड आणि ओली रोबिन्सन या जोडगोळीला जेम्स अँडरसनला साथ देण्याची मोलाची जबाबदारी होती. दोघांनी त्यांच्या खांद्यावरील ओझे लिलया पेलून दाखवले. दुसऱ्या कसोटी सामन्यात वूडने रिषभ पंत, रोहित शर्मा, केएल राहुल या तगड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्याच्या दुखापतीमुळे इंगल्ंडच्या अडचणी वाढल्या असून अनुभवी गोलंदाज अँडरसन वगळता त्यांना मोजका अनुभव असलेल्या गोलंदाजांनिशी मैदानात उतरावे लागणार आहे.

Mark Wood
रवी शास्त्री प्रशिक्षकपद सोडणार? मुंबईकर माजी क्रिकेटर म्हणतो...

बॉडची उणीव भरुन काढण्यात वूड यशस्वी ठरला होता. त्याने गतीच्या जोरावर भारतीय फलंदाजांना अडचणीतही आणले होते. पण आता इंग्लंडला त्याच्याशिवाय मैदानात उतरण्याची वेळ आलीये. नॉटिंघमच्या मैदानात रंगलेला सामना अनिर्णित राहिल्यानंतर क्रिकेटच्या पंढरीत भारतीय संघाने विजय धमाका केला होता. लॉर्ड्सच्या मैदानातील विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ही आघाडी भक्कम करुन मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे यजमान इंग्लंड सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.