IND vs ENG Test Match :लगानची ‘चौपट’ वसुली; पाचव्या सामन्यासह भारताने मालिका ४-१ जिंकली

इंग्लंडच्या बॅझबॉल नावाची टिमकी फोडून भारताने पाचवा कसोटी सामना तीन दिवसांच्या आत एक डाव आणि ६४ धावांनी जिंकला आणि अंतिम कसोटीसह पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली.
ind vs eng india won test cricket series by 4 1 beat england 5th test by 64 runs
ind vs eng india won test cricket series by 4 1 beat england 5th test by 64 runsSakal
Updated on

धरमशाला : इंग्लंडच्या बॅझबॉल नावाची टिमकी फोडून भारताने पाचवा कसोटी सामना तीन दिवसांच्या आत एक डाव आणि ६४ धावांनी जिंकला आणि अंतिम कसोटीसह पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली.

१०० वा कसोटीत सामना खेळणाऱ्या अश्विनने सामन्यात नऊ विकेटची कामगिरी केली. कुलदीप सामन्यात; तर यशस्वी जयस्वाल मालिकेत सर्वोत्तम ठरला. हैदराबाद येथील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने पुढचे तीन सामने चार दिवसांत जिंकले होते.

या अंतिम सामन्यात तर इंग्लंड संघाला जवळपास अडीच दिवसांतच शरण आणले. इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांवर संपुष्टात आणला. अश्विनने या डावात पाच विकेट मिळवण्याची कामगिरी केली.

कालच्या दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४७३ धावा करणाऱ्या भारताने २५५ धावांची आघाडी घेतली होती. इंग्लिश फलंदाजांची एकूणच मानसिकता पाहता हा सामना आज तिसऱ्या दिवशी संपणार अशी शक्यता होती, परंतु समोर पराभव दिसत असला, तरी आम्ही आक्रमक खेळ करणार अशा ‘बॅझबॉल’ मानसिकतेचा फुगा भारतीयांनी पुन्हा एकदा फोडला.

आज तिसऱ्‍या दिवशी जिमी अँडरसनने कुलदीप यादवला लगेच बाद करून सुरुवात चांगली केलीच, वर ७०० व्या कसोटी बळीची नोंद केली. लगेच बशीरच्या गोलंदाजीवर बुमरा २० धावा करून बाद झाला.

भारताचा डाव ४७७ धावांवर संपला. ४६ षटकांचा अथक मारा करून १७३ धावांचा चोप सहन करून बशीरने ५ फलंदाजांना बाद केले.

तीन बाद ३६ धावसंख्येवर जॉनी बेअरस्टो अनुभवी ज्यो रूटला येऊन मिळाला. थोड्याच वेळात बेअरस्टोने मोठे फटके मारणे चालू केले. त्याने अश्विनला तीन लांबच्या लांब षटकार मारले. बुमराने मग अश्विनच्या जागी कुलदीपला गोलंदाजीला बोलावले.

कुलदीपने लगेचच आत वळणाऱ्‍या चेंडूवर बेअरस्टोला पायचित केले. उपाहाराअगोदर जेव्हा अश्विनने बेन स्टोक्सला बोल्ड केले तेव्हा इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पडल्याचे दिसले. बेन स्टोक्सला बाद करताना अश्विनने टाकलेला चेंडू केवळ अफलातून होता.

उपाहारानंतर ज्यो रूट तळातील फलंदाजांना घेऊन किती काळ किल्ला लढवतो हेच बघायला प्रेक्षक धरमशालाच्या निसर्गसुंदर मैदानावर जमा झाले. बेन फोक्सला अश्विनने मोठ्या फटक्याच्या मोहात पाडून बोल्ड केले, तो अश्विनचा पाचवा बळी होता.

दुसऱ्या षटकापासून शरणागती

धरमशालाची खेळपट्टी फलंदाजीला अजून चांगली होती. रोहित शर्माच्या पाठीत चमक भरल्याने तो मैदानात आला नाही. बुमराने नवा चेंडू टाकायला त्याच्या सोबतीला अश्विनला बोलावले. हवेत उंची दिलेल्या चेंडूवर अश्विनने बेन डकेटला साफ चकवून त्रिफाळाचीत केले तिथेच इंग्लंड संघाची पडझड चालू झाली. पहिल्या डावात उतावळा फटका मारताना बाद झालेला ओली पोप अश्विनला स्वीपचा फटका मारताना झेलबाद झाला आणि झॅक क्रॉलीला अश्विनने चेंडू वळवून सर्फराझकडे झेल द्यायला भाग पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.