IND vs ENG : टीम इंडियाने गतविजेत्यांचे केले पॅक अप! विजयाचा 'षटकार' मारत संपवला 20 वर्षाचा दुष्काळ

IND vs ENG : टीम इंडियाने गतविजेत्यांचे केले पॅक अप! विजयाचा 'षटकार' मारत संपवला 20 वर्षाचा दुष्काळ
Updated on

India vs England Live Cricket Score World Cup 2023 : भारताने गतविजेत्या इंग्लंडचा तब्बल 100 धावांनी पराभव करत आपला विजयी षटकार मारला. भारत आता गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचला आहे. तसेच सेमी फायलनचे तिकीटही निश्चित केले. भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा जवळपास 20 वर्षांनी पराभव केला आहे. यापूर्वी 2003 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला होता.

भारताविरूद्धच्या या दारूण झालेल्या पराभवाने इंग्लंडचे यंदाच्या वर्ल्डकपमधून जवळपास पॅक अप झाले आहे. त्यांचा हा सहा सामन्यातला 5 वा पराभव आहे. ते सध्या गुणतालिकेत 2 गुणांसह तळातच आहेत.

भारताने रोहित शर्माच्या 87 आणि सूर्यकुमार यादवच्या 49 धावांच्या जोरावर ठेवलेल्या 230 धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचा संघ 129 धावात गारद झाला. भारताकडून मोहम्मद शामीने 4 तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. त्याला कुलदीप यादवने 2 आणि रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये आज पहिल्यांदाच दुपारी फलंदाजी करत होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी भारताला 50 षटकात 9 बाद 229 धावात रोखले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावा केल्या. भारताच्या तब्बल सहा फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.

भारताची आज फलंदाजी लौकिकास साजेशी झाली नाही. भारताचे फक्त तीन फलंदाजच दुहेरी आकडा गाठू शकले. मात्र ज्या तीन फलंदाजींनी दुहेरी आकडा गाठला त्यांनी दमदार खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने 87, सूर्यकुमार यदावने 49 धावा केल्या तर केएल राहुलने 39 धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने देखील सूर्यकुमार बाद झाल्यानंतर संघासाठी उपयुक्त अशा 16 धावा केल्या.

इंग्लंडकडून डेव्हिड विलीने भेदक मारा करत भारताचे तीन मोठे मासे गळाला लावले. त्याने विराट कोहलीला शुन्यावर तर केएल राहुलला 39 आणि सूर्यकुमार यादवला 49 धावांवर बाद केले. त्याला आदिल रशीद आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

इंग्लंड पराभवाच्या छायेत

कुलदीप यादवने 27 धावा करून एकाकी झुंज देण्याऱ्या लिम लिव्हिंगस्टोनला बाद करत इंग्लंडला पराभवाच्या खाईत लोटले.

98 - 7 : जडेजाने दिला सातवा धक्का

रविंद्र जडेजाने ख्रिस वोक्सला बाद करत इंग्लंडला शंभर धावांच्या आत सातवा धक्का दिला.

मोहम्मद शामीने मोईन अलीला केलं बाद

मोहम्मद शामीने सेट होऊ पाहणाऱ्या मोईन अलीला बाद करत इंग्लंडला सहावा धक्का दिला.

52-5 (15.3 Ov) : कुलदीपने कर्णधाराची केली शिकार

कुलदीप यादवने कर्णधार जॉस बटलरचा 10 धावावर त्रिफळा उडवत इंग्लंडची अवस्था 5 बाद 52 धावा अशी केली.

39-4 मोहम्मद शमीने उडवला बेअरस्टोचा उडवला त्रिफळा

मोहम्मद शामीने सलामीवीर जॉनी बेअरस्टोचा 14 धावांवर त्रिफळा उडवत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 4 बाद 39 धावा अशी झाली.

33 - 3 मोहम्मद शामीची कमाल, स्टोक्स शुन्यावर बाद 

जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पाठोपाठ दोन धक्के दिल्यानंतर मोहम्मद शामीने देखील इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्याने बेन स्टोक्सला शुन्यावर बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले.

30-2 : जसप्रीत बुमराहने इंग्लंडला दिले पाठोपाठ दोन धक्के

जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा पॉवर प्लेमध्ये भारताला यश मिळवून दिले. त्याने डेव्हिड मलानला 16 धावांवर बाद केले. अन् पुढच्याच चेंडूवर जो रूटला देखील पायचीत बाद करत सलग दुसरी विकेट घेतली.

208-8  : सूर्याची खेळी संपुष्टात

सूर्यकुमारचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले. स्लॉग ओव्हरमध्ये धावा करण्याच्या नादात तो डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

सूर्यकुमार यादवचे झुंजार खेळी

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी करत 47 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने 200 धावांचा टप्पा पार केला.

195-7 (44.5 Ov) : मदार आता सूर्यावरच

जडेजा बाद झाल्यानंतर आलेला मोहम्मद शामी एक धाव करून बाद झाला. भारताचे द्विशतक अजून धावफलकावर लागलेले नाही. भारताचा 360 डिग्री प्लेअर सूर्यकुमार यादववरच आता टीम इंडियाची मदार आहे.

भारतीय संघ पुन्हा सापडला अडचणी! रोहित शर्माचं हुकलं शतक अन् जडेजा ही तंबुत

रवींद्र जडेजाही आऊट झाला आहे. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. जडेजा 8 धावा करू शकला. भारताची धावसंख्या 41 षटकात 6 बाद 183 धावा आहे. सूर्यकुमार यादव 31 आणि मोहम्मद शमी 1 धावांवर खेळत आहेत.

IND vs ENG Live Score : टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माचं हुकलं शतक

164 धावांवर भारताला पाचवा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 101 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून बाद झाला.

37 षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा आहे. सध्या रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत.

 राहुलची संयमी खेळी संपली! भारताला मोठा धक्का

भारताला चौथा धक्का बसला आहे. राहुल 58 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. डेव्हिड विलीने त्याला आऊट केले. आता सूर्यकुमार यादव रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे. 31 षटकांनंतर भारताची धावसंख्या 137/4 आहे.

भारताची शंभरी पार...

25 षटकांनंतर भारताने तीन विकेट गमावून 100 धावा केल्या आहेत. केएल राहुल 43 चेंडूत 30 धावा करून क्रीजवर आहे आणि रोहित शर्मा 69 चेंडूत 57 धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 60 धावांची भागीदारी झाली आहे.

टीम इंडियाच्या संकटात कर्णधार रोहित आला धावून!  

रोहितने 24व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. या वर्ल्ड कपमधील रोहितचे हे दुसरे अर्धशतक आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध 86, अफगाणिस्तानविरुद्ध 131, बांगलादेशविरुद्ध 48 आणि न्यूझीलंडविरुद्ध 46 धावा केल्या.

24 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 89 धावा आहे. रोहित सध्या 69 चेंडूत 57 धावांवर तर केएल राहुल 37 चेंडूत 19 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास, 'हा' मोठा टप्पा केला पूर्ण

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये रोहितच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हेच करू शकले होते.

गिल 9, कोहली 0, श्रेयस 4 ...! इंग्लंड गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी टाकल्या नांग्या

12व्या षटकात 40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 16 चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 12 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा आहे.

पॉवरप्लेमध्ये इंग्लंडची शानदार गोलंदाजी

पहिल्या पॉवरप्लेमध्ये 10 षटके इंग्लंडने शानदार गोलंदाजी केली. त्याने केवळ 35 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. ख्रिस वोक्सने शुभमन गिलला (9) क्लीन बोल्ड केले, तर डेव्हिड विलीने विराट कोहलीला (0) स्टोक्सकरवी झेलबाद केले. सध्या रोहित शर्मा 30 चेंडूत 24 धावा करून क्रीजवर आहे तर श्रेयस अय्यरने 2 धावा केल्या आहेत.

इंग्लंड समोर भारताची हालत खराब! शुभमन गिलनंतर विराट कोहली शून्यावर आऊट

भारताला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली खाते न उघडताच आऊट झाला आहे. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर कोहलीने बेन स्टोक्सच्या हातात झेल दिला. सात षटकांनंतर भारत 2 बाद 28 धावा आहे.

शुभमन गिल क्लीन बोल्ड! 26 धावांवर भारताला पहिला धक्का

चौथ्या षटकात 26 धावांवर भारताला पहिला धक्का बसला आहे. इनस्विंग बॉलवर ख्रिस वोक्सने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. शुभमनला 13 चेंडूत 9 धावा करता आल्या.

4,6,6... पहिल्या मेडन ओव्हरनंतर रोहितने घातला राडा!

शुभमन गिलने दुसऱ्याच षटकात ख्रिस वोक्सच्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाचे खाते उघडले. पहिली ओव्हर मेडन गेली होती. पण ख्रिस वोक्सच्या तिसऱ्या षटकात रोहितने राडा घातला. आणि २ षटकार आणि १ चौकार मारला. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता २२ धावा आहे.

पहिलेच ओव्हर मेडन...! शुभमनने चौकार मारत उघडले टीम इंडियाचे खाते

भारतीय संघाची पहिली ओव्हर मेडन गेली आहे. डेव्हिड विलीने पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. रोहित शर्मा स्ट्राइकवर होता.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे....

भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.

IND vs ENG Live Score : भारताविरुद्ध इंग्लंडने नाणेफेक जिंकली!

भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बटलरने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी, भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, कारण पाठलाग करताना संघाने चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत संघाला स्वतःला आव्हान द्यायचे आहे.

रोहितने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे फक्त सूर्यकुमार यादव आणि शमी खेळताना दिसणार आहेत.

उपकर्णधार बाहेर तर टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार? जाणून प्लेइंग-11

हार्दिकच्या अनुपस्थितीत टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार हा मोठा प्रश्न आहे. भारत पाच गोलंदाजांसह जाऊ शकतो. याच कारणामुळे शुबमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनीही नेटमध्ये गोलंदाजी केली.

भारताचे संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.