VIDEO :.. म्हणून जाडेजानं काढलेला 'बोल्ड' ठरतोय चर्चेचा विषय

यजमान इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
IND vs ENG
IND vs ENGTwitter
Updated on

England vs India, 3rd Test: इंग्लंडने लीड्सच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 350 + धावा केल्या आहेत. इंग्लडच्या आघाडी फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. सलामीवीर रॉरी बर्न्स 61(153), हसीब हमीद 68 (195) आणि डेविड मलान 70 (128) या तिघांनी बाद होण्यापूर्वी अर्धशतके झळकावली.

मोहम्मद शमीने भारतीय संघाला बर्न्सच्या रुपात पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर रविंद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) दुसरी विकेट घेत भारतीय फिरकीचा मालिकेतील दुष्काळ संपुष्टात आणला. 63 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने हसीब हमीद (Haseeb Hameed) चा त्रिफळा उडवला. इंग्लंड विरुद्दच्या मालिकेतील जडेजाची ही पहिली विकेट ठरली. एवढेच नाही तर इंग्लंडच्या संघातील 41 विकेट्सनंतर भारतीय फिरकीपटूला यश मिळाले. त्यामुळेच या विकेट्ची जोरदार चर्चा रंगताना दिसते.

IND vs ENG
IND vs ENG: रूटने पुन्हा रडवलं; इंग्लंडपुढे भारतीय गोलंदाज बेजार

बिन बाद 120 धावांवरुन इंग्लंडच्या सलामीवीरांनी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. सलामीच्या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात भारतीय संघाला यश आले असले तरी इंग्लंडचा संघ सामन्यात मजबूत स्थितीत पोहचला आहे. रोहित शर्मा 19 आणि अजिंक्य रहाणेच्या 18 धावा वगळता एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. दुसरीकडे इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. इतर गोलंदाजांनी त्यांना उत्तम साथ दिली. परिणामी भारतीय संघाचा पहिला डाव स्वस्तात आटोपला.

IND vs ENG
IPL 2021: पंजाबच्या संघाने ताफ्यात आणला इंग्लंडचा स्टार खेळाडू

आघाडीचे तिघे अर्धशतकी करुन माघारी फिरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने मालिकेत आणखी एक शतक झळकावले. जॉनी बेयरस्टो 29 धावा करुन माघारी परतला असून इंग्लडने 350 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली असून मालिकेत बरोबरी करण्याच्या दृष्टीनेच त्यांचा प्रवास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.