Ind vs Eng Sarfaraz Khan : सर्फराज खानच्या जर्सीचा क्रमांक का आहे 97? वडिलांनी सकाळशी बोललाना केला खुलासा

बराच काळ संधीची वाट पाहिल्यानंतर कसोटी पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या सर्फराझ खानने संधीचे सोने करताना आपली उपयुक्तताही सिद्ध केली.
ind vs eng Sarfaraz Khan test jersey 97 number his father name Story Behind
ind vs eng Sarfaraz Khan test jersey 97 number his father name Story Behind sakal
Updated on

Sarfaraz Khan : बराच काळ संधीची वाट पाहिल्यानंतर कसोटी पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या सर्फराझ खानने संधीचे सोने करताना आपली उपयुक्तताही सिद्ध केली. प्रतिहल्ला करत त्याने ६६ चेंडूंत ६२ धावा करून सर्वांचे लक्ष तर वेधलेच, पण त्याचबरोबर वडिलांच्या नावावरून जर्सी क्रमांक निवडून आदरही व्यक्त केला. नौशाद हे सर्फराझच्या वडिलांचे नाव आहे. त्यावरून त्याने ९ आणि ७ असा ९७ क्रमांक जर्सीचा निवडला.

ind vs eng Sarfaraz Khan test jersey 97 number his father name Story Behind
Ind vs Eng Test : ३ बाद ३३ वरून डाव सावरला ; रोहित शर्मा, रवींद्र जडेजाची शतके

नौशाद खान यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली. एवढेच नव्हे तर त्यांचा दुसरा मुलगा मुशीर हा सुद्धा नुकत्याच संपलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेतही हाच जर्सी क्रमांक वापरत होता.

‘सकाळ’शी बोलताना नौशाद म्हणाले, सर्फराझ भले धावचीत झाला असेल; परंतु आज मी भरपूर आनंदी आहे. मुंबईचा आणखी एक खेळाडू कसोटी क्षितिजावर उतरला आहे, हे मुंबईसाठी आनंददायी आहे. सर्फराझला कसोटी कॅप देण्याचा तो क्षण आमच्यासाठी फारच भावुक होता. याचसाठी आम्ही अपार मेहनत घेत होतो. नौशाद हे सर्फराझचे वडील तसेच प्रशिक्षकही आहेत. कोणतेही दडपण न घेता सर्फराझने आपला नैसर्गिक खेळ केला हे महत्त्वाचे आहे, असे नौशाद म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()