जोमात असणारी टीम कोमात; विराट सेनेच्या नावे लाजिरवाणा विक्रम

लीड्सच्या मैदानातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झालीये.
ENG vs IND
ENG vs INDE Sakal
Updated on

England vs India, 3rd Test : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यातील निराशजनक कामगिरी नोंदवली, लीड्सच्या मैदानात भारतीय संघाची भक्कम फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 78 धावांवर कोलमडला. इंग्लंडमधील लीड्सच्या मैदानातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झालीये.

कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाची ही नववी निच्चांकी धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एडलेड कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 36 धावांत आटोपला होता. ही भारताच्या खात्यात जमा असलेली निच्चांक धावसंख्या आहे. रोहित शर्माच्या 105 चेंडूतील 19 धावा आणि अजिंक्य रहाणेच्या 54 चेंडूतील 18 धावा वगळता भारतीय संघातील एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.

ENG vs IND
IPL 2021 : राजस्थानच्या संघात 'रॉयल' गोलंदाजाची एन्ट्री

इंग्लंडमध्ये भारतीय संघाची ही तिसरी निच्चांक धावसंख्या आहे. यापूर्वी 1974 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघ अवघ्या 42 धावांत आटोपला होता. ही इंग्लंडमधील भारताची सर्वात खराब कामगिरी आहे. याशिवाय 1952 मध्ये भारतीय संघ इंग्लंडमध्ये 58 धावांत गारद झाला होता.

ENG vs IND
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पाकिस्तानचे कोच कोरोना पॉझिटिव्ह

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाकडून नोंदवलेली ही तिसरी निच्चांकी धावसंख्या ठरलीये. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 2008 मध्ये भारतीय संघ 76 धावांत आटोपला होता. 1987 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघ 75 धावांत आटोपला होता.

नॉटिंघमच्या मैदानातील कसोटी सामन्याने भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात केली. पहिला कसोटी सामना भारतीय संघाच्या बाजूने झुकला होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर हा सामना अनिर्णित राहिला. लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघाने पिछाडीवरुन दमदार कमबॅक केले. क्रिकेटच्या पंढरीत 151 धावांनी विजय नोंदवत भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये. तिसऱ्या कसोटीत मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. भारतीय संघाचा पहिल्या डाव 78 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केलीये. सलामी जोडीने भारतीय संघाने केलेल्या धावा पार करुन आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा संघ भक्कम स्थितीत पोहचला असून मालिकेत बरोबरी करण्याच्या दिशेने त्यांची पावले पडताना दिसताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.