श्रीलंका दौरा आटोपून थेट इंग्लंड दौऱ्याला पोहचलेल्या सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ (Suryakumar Yadav and Prithvi Shaw) या मुंबईक जोडीने क्वांरटाईन प्रक्रिया पूर्ण केलीये. लॉर्ड्सच्या मैदानात या जोडगोळीनं टीमसोबत जॉईन झाल्याचेही पाहायला मिळाले. 14 ऑगस्ट रोजी लॉर्ड्सच्या मैदानात हे दोघेही भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी झाले.
इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच शुभमन गिल, वाशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. या खेळाडूंच्या बदल्यात बीसीसीआयने सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉल इंग्लंड दौऱ्यावर पाठवले आहे. 3 ऑगस्टला ही जोडी इंग्लंडमध्ये दाखल झाली होती. सोशल मीडियावर दोघेही चांगलेच सक्रीय असून या माध्यमातूनच त्यांनी इंग्लंडमध्ये पोहचल्याची माहिती दिली होती.
त्यानंतर आता या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये सूर्या आणि पृथ्वीनं शाहरूख खानच्या लोकप्रिय ठरलेल्या बाजीगर (Shah Rukh Khan starrer- Baazigar) चित्रपटातील सीन रिक्रिएट केल्याचे पाहायला मिळते. यात दोघांनी जॉनी लिवर आणि दिनेश हिंग या कलाकारांची नक्कल केलीये. क्रिकेटर्सच्या या कलाकारीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून नेटकरी त्यांच्या व्हिडिओला पसंती देताना पाहायला मिळते.
सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केलाय. दोघांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यात दडलेला अभिनेता बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या अभिनयाला दादही मिळताना दिसते. फिरकीपटू युजवेंद्र चहलसह या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 'हम पागल नहीं है हमारा दिमाग खराब है,' अशी कमेंट पृथ्वी शॉने केलीये. यावरही लाइक्सची बरसात होताना दिसते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये सध्या कठोर नियमावलीचे पालन करावे लागत आहे. त्यामुळेच श्रीलंका दौऱ्यावरुन भारतीय संघात बदली खेळाडू म्हणून पोहचल्यानंतर या दोघांना सक्तीच्या क्वारंटाईनच्या प्रक्रियेतून जावे लागले. परिणामी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सिलेक्शनलाही ही दोघेही उपलब्ध नव्हती. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानातील टीम इंडियाची कामगिरी पाहता या दोघांना पुढील सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. लोकेश राहुलने सलामीला उत्तम कामगिरी करुन दाखवलीये. दुसरीकडे मध्यफळीत अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांनीही संघासाठी आवश्यक खेळी केलीये. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवला पुढच्या सामन्यात बाकावरच बसावे लागू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.