T20 World Cup-2022 Semifinal IND vs ENG : टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दुसरा सामना आज भारत आणि इंग्लंड यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार आहे. या सामन्यावरही पावसाची सावट आहे. इतकंच नाही तर मॅचच्या आदल्या रात्री अॅडलेडमध्ये खूप पाऊस झाला. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तरी टीम इंडियाच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे.
अॅडलेडमध्ये हवामान बदलले आहे. रात्रभर पाऊस पडला. इतकंच नाही तर सकाळी अॅडलेडमध्येही पाऊस पडत होता. सध्या वातावरण दयाळू असून पाऊस थांबला असला तरी ढग मात्र कायम आहेत. अंदाजानुसार, उपांत्य फेरीचा सामना संध्याकाळी होईल तेव्हा पावसाची शक्यता नाही. Accuweather.com च्या मते, संध्याकाळी अॅडलेडमध्ये पावसाची 5-10 टक्के शक्यता आहे. तथापि हे देखील ओळखले पाहिजे की ऑस्ट्रेलियामध्ये हवामान वेगाने बदलत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने सुपर-12 फेरीतील गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळवताना उपांत्य फेरी गाठली असुन त्याने फक्त एकच सामना गमावला आणि 4 सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या टीमला फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडने त्यांच्या ‘ग्रुप’मध्ये दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने 5 पैकी 3 सामने जिंकले आणि एकात पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंडचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.