Team India squad for next 3 Tests against England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. हैदराबाद कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला.
आता या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला पुढील तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करायचा आहे. यासंदर्भात काही माहिती समोर आली आहे. पुढील सामन्यात भारताचे तीन दिग्गज खेळाडू पुनरागमन करणार आहेत. त्याचबरोबर दोन खेळाडू संघातून बाहेर जाऊ शकतात.
राजकोट कसोटीपूर्वी भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पुढचा सामना खेळणार की नाही हा सर्वात मोठा सस्पेन्स आहे. याशिवाय, केएल राहुल दुखापतीतून बरा झाला आहे आणि पुढील सामन्यात पुनरागमन करण्यास तयार आहे. रवींद्र जडेजा पुढचा कसोटी सामना खेळणार की नाही यावर कायमच सस्पेंस आहे.
दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळले जाऊ शकते, अशा बातम्याही येत आहेत. तिसऱ्या कसोटीपूर्वी संघ निवडकर्ता आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुढच्या कसोटीत कोणाला खेळवायचे आणि कोणाला न खेळवायचे याच्या विचार पडले आहेत.
बीसीसीआयच्या सूत्राने या सर्व प्रश्नांवर एक मोठे अपडेट दिले आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, पुढील सामन्यात दोन खेळाडू परतणार आहेत, जे दुसरा कसोटी सामना खेळले नव्हते. याशिवाय 3 स्टार खेळाडू तिसरा कसोटी सामना खेळताना दिसणार नाहीत.
पण विराट कोहलीबद्दल एक अपडेट आली आहे की तो पुढील 2 सामन्यांमधूनही बाहेर राहू शकतो. किंग तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकेल, अशी अटकळ बांधली जात होती. आता बातम्या येत आहेत की, तो पाचव्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो, त्याआधी या अनुभवी खेळाडूसाठी संघात पुनरागमन करणे कठीण आहे.
त्याचवेळी, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही, त्यामुळे तो पुढील सामन्यातूनही बाहेर जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात धाव घेताना जडेजाला दुखापत झाली होती. याशिवाय भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल पुढील सामन्यात पुनरागमन करणार आहे.
राहुलच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला होता. जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल अशी बातमी होती, पण बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, बुमराह पुढील कसोटी सामनाही खेळताना दिसणार आहे.
दुसऱ्या कसोटीत भारताचा स्टार फलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र मुकेश आपल्या कामगिरीने प्रभावित करू शकला नाही, त्यामुळे मुकेश कुमारला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात येणार आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा पुन्हा एकदा संघात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.