Ind vs Eng: दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी झाली होती दुखापत
Ind vs Eng 2nd Test: लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी (Team India) अप्रतिम मारा करत टीम इंडियाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. शेवटच्या दिवशी आधी शमी-बुमराह (Shami Bumrah Batting) जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी (England Batsman) भारतीय गोलंदाजीपुढे गुडघे टेकले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या खेळात चांगली कामगिरी केली होती पण शेवटच्या दिवशी त्यात सातत्य राखणं त्यांना शक्य झालं नाही. त्यापैकी एका खेळाडूच्या खेळण्यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची चर्चा आहे.
भारतीय संघ चौथ्या दिवशी फलंदाजी करत होता. त्यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड चौकार अडवण्यासाठी धावला आणि त्याने सीमेरेषेवर स्वत:ला झोकून दिले. त्यावेळी त्याच्या पायाला काही अंशी दुखापत झाली होती. त्यानंतर पाचव्या दिवशी त्याने गोलंदाजी केली. पण त्याची दुखापत कितपत गंभीर आहे याबद्दल तेव्हा कल्पना आलेली नव्हती. ताज्या माहितीनुसार, मार्क वूडच्या पायाला झालेल्या दुखापतीवर संघाच्या मेडिकल टीमचे सदस्य उपचार करत आहेत. जर मार्क वूडची दुखापत गंभीर नसेल तर तो नक्कीच खेळेल. पण जर दुखापत गंभीर होऊ शकणार असेल तर मात्र तसं स्पष्ट सांगितलं जाईल, असं मेडिकल टीमने सांगितलं.
"जर मार्क वूड तिसऱ्या सामन्यासाठी फिट नसेल तर तसं संघ व्यवस्थापनाला सांगण्यात येईल. पण सध्या त्याच्या दुखापतीबद्दल सांगणं घाईचं ठरेल. म्हणून आता काहीच निर्णय घेणे शक्य नाही. त्याच्या टीममधील समावेशाबद्दल सामन्याच्या काही वेळ आधी निर्णय घेतला जाईल", अशी माहिती त्यांनी दिली.
मार्क वूड दुसऱ्या कसोटी भारतासाठी डोकेदुखी ठरला होता. स्टुअर्ट ब्रॉडच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले होते. त्यावेळी पहिल्या डावात त्याने रविंद्र जाडेजा आणि ऋषभ पंत या दोघांना बाद केले होते. दुसऱ्या डावात तर त्याने पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल आणि अर्धशतकवीर रोहित शर्मा दोघांना स्वस्तात माघारी धाडले होते. त्याचसोबत त्याने सेट झालेल्या चेतेश्वर पुजारालाही तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी त्याचे संघात नसणे भारतीय संघासाठी एका अर्थी दिलासाच असू शकेल, मात्र तो खेळणार की नाही, ते अंतिम क्षणीच ठरवलं जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.