Ind vs Eng : विराटनंतर आता 'हा' खेळाडूही पहिल्या कसोटीतून बाहेर? धक्कादायक अपडेट आले समोर

India vs England Test Series 2024 News :
India vs England Test Series 2024 News Marathi
India vs England Test Series 2024 News Marathisakal
Updated on

India vs England Series 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला आहे. दुसरीकडे मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर झाला आहे. त्याचवेळी आणखी एका खेळाडूला मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर जाण्याचा धोका आहे.

India vs England Test Series 2024 News Marathi
ICC Awards 2023 : सूर्याकडे आयसीसीच्या टी-20 संघाचं नेतृत्व; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

इंग्लंडचा संघ रविवारी अबुधाबीहून भारतात पोहोचला. इंग्लंड संघाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. मात्र इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशीर संघासोबत भारतात आलेला नाही. व्हिसाच्या समस्येमुळे शोएब बशीर भारतात आला नाही. कागदोपत्री उशीर झाल्यामुळे बशीर सध्या यूएईमध्ये आहे.

India vs England Test Series 2024 News Marathi
IPL 2024 Schedule : टीम इंडियाची घोडी पुन्हा दमणार... वर्ल्ड कपच्या फक्त 5 दिवस आधी आयपीएल संपणार?

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम म्हणाले की, ईसीबीने हे प्रकरण भारत सरकारसह संबंधित अधिकाऱ्यांकडे घेतले आहे आणि येत्या 24 तासांत चांगली बातमी अपेक्षित आहे. हॅरी ब्रूक भारत दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर डॅन लॉरेन्सचा १६ जणांच्या संघात समावेश करण्यात आला.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, रेहान अहमद, डेन लॉरेन्स, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, बेन फोक्स (यष्टीरक्षक), जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन , जो रूट, मार्क वुड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.