झेल पकडण्यासाठी बेअरस्टोने हवेत उडी घेतलीच होती त्यावेळी...
Ind vs Eng 3rd Test: इंग्लंडने पहिल्या डावात ४०० धावांपार मजल मारल्यानंतर टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही पहिल्या डावाप्रमाणेच खराब झाली. ५४ चेंडूंचा संमयाने सामना केल्यानंतर एका आऊटस्विंग चेंडूवर राहुल बाद झाला. अपेक्षेपेक्षा जास्त उसळलेला चेंडू राहुलच्या बॅटच्या कडेला लागून गेला आणि तो झेलबाद झाला. ओव्हरटनने त्याला बाद केलं पण असं असलं तरी चर्चा झाली जॉनी बेअरस्टोच्या कॅचची...
ओव्हरटटने दुसऱ्या डावाच्या १८व्या षटकात राहुलला गोलंदाजी केली. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ओव्हरटन आणि राहुल यांच्यात थोडीशी बाचाबाची झाली. त्यानंतर राहुल मोठा फटका खेळेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती पण तो संयमाने खेळत राहिला. अशा वेळी नेमका षटकाचा शेवटचा चेंडू थोडासा जास्त उसळला आणि चेंडू आऊटस्विंग झाला. तो चेंडू खेळणं त्याला शक्य झाला नाही. चेंडूची बॅटला एज लागली आणि जॉनी बेअरस्टोने अप्रतिम झेल टिपला.
त्याआधी, इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताचा डाव ७८ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. रॉरी बर्न्स (६१) आणि हमीद हसीब (६८) हे दोघे बाद झाल्यावर कर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलानने डाव सांभाळला. या दोघांनी १३९ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडं मोडलं. रूटने मालिकेतील तिसरं शतक (१२१) ठोकले. मलाननेही ७० धावा केल्या. त्यानंतरच्या फलंदाजांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. ओव्हरटनच्या ३२ धावांमुळे इंग्लंडने ४००चा टप्पा पार केला, पण अखेर त्यांचा डाव ४३२ धावांवर आटोपला. मोहम्मद शमीने ४ तर बुमराह, जाडेजा, सिराजने २-२ बळी घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.