Ind vs Eng T20: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया उपांत्य फेरीतून बाहेर?

भारताची उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण?
ind vs eng womens t20 world cup 2023 indian women team semi final scenario
ind vs eng womens t20 world cup 2023 indian women team semi final scenariosakal
Updated on

India vs England Women Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC महिला टी-20 विश्वचषक 2023 हंगामाची पहिले दोन सामने जिंकून धमाकेदार सुरुवात केली. पण कालच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव करत आपले ग्रुपमधील पहिले स्थान अबाधित राखले.

ind vs eng womens t20 world cup 2023 indian women team semi final scenario
IND vs AUS : अक्षर पाया अन् अश्विनचा कळस; दोघांच्या शतकी भागीदारीने भारताला सावरले

या पराभवामुळे आता उपांत्य फेरी गाठण्याच्या भारतीय संघाच्या आशाही मावळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड संघ 6 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लिश संघाचा नेट रन रेट खूपच चांगला असून त्याने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

भारतीय संघाला आता ग्रुप स्टेजमधील शेवटचा आणि चौथा सामना 20 फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. तर इंग्लंडला शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानचेही दोन सामने बाकी असून त्यांचे सध्या ५ गुण आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरीत कोणाला स्थान मिळेल हे सांगता येत नाही.

ind vs eng womens t20 world cup 2023 indian women team semi final scenario
INDW vs ENGW : 4, 4, 4, 4, 6, 6 रिचा शेवटपर्यंत लढली, स्मृतीही भिडली मात्र...

भारताची उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण?

  • भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

  • तसेच या गटात समाविष्ट असलेल्या पाकिस्तान संघाचे यावेळी केवळ 2 गुण आहेत. त्याने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने आपला एक सामना गमावावा अशी प्रार्थना भारतीय संघाला करावी लागेल.

  • जर पाकिस्तानने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आणि भारतीय संघाने शेवटचा सामना जिंकला तर नेट रनरेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. सध्या पाकिस्तानचा नेट रनरेट चांगला आहे. अशा स्थितीत त्याची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.