IND vs NZ: नटखट ईशान किशन! घेणार होता पांड्याचा बदला मात्र...

Ishan Kishan Pranks Tom Latham By Imitating Hardik Pandya Wicket Controversy
Ishan Kishan Pranks Tom Latham By Imitating Hardik Pandya Wicket Controversy
Updated on

India vs New Zealand 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळल्या गेला. या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने शानदार द्विशतक झळकावले. गिलने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावांची खेळी केली, पण टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने आऊट झाला तो चर्चेचा विषय राहिला. त्यानंतर इशान किशननेही क्रिकेटर्स आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.(Ishan Kishan Pranks Tom Latham By Imitating Hardik Pandya Wicket Controversy)

Ishan Kishan Pranks Tom Latham By Imitating Hardik Pandya Wicket Controversy
IND vs NZ: गिलचे द्विशतक पाण्यात जाता जाता वाचलं! 'लोकल बॉय' सिराजने केली कमाल

नटखट ईशान किशन गंमतीने स्टंपवर बेल्स उडवले, त्यावेळी फलंदाज क्रिजवर उपस्थित होता. कुलदीप यादवने टाकलेल्या डावाच्या 16व्या षटकात हा प्रकार घडला. त्या षटकातील चौथ्या चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमने चेंडूचा बचाव केला. दरम्यान, ईशानने अपील केले. यानंतर मैदानावरील पंचांनी थर्ड अंपायरकडे जाणे योग्य मानले.

लॅथमच्या शरीराचा यष्टींशी संपर्क नसल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते आणि तो क्रिझमध्येही होता. ग्राउंडवरील मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवले तेव्हा ईशान किशनच्या चेहऱ्यावर हसू उमटले. खरंतर तो हार्दिक पांड्याचा बदला घेत होता. मात्र ते होऊ शकलं नाही.

Ishan Kishan Pranks Tom Latham By Imitating Hardik Pandya Wicket Controversy
IND vs NZ: ब्रेसवेलने टीम इंडियाच्या गोलंदाजांना इतकं धुतले की...! ठोकल्या 22 चेंडूत 108 धावा

हार्दिक पांड्या बरोबर काय झालं होतं ? (Hardik Pandya Wicket Controversy)

ही संपूर्ण घटना भारतीय डावाच्या 40व्या षटकात घडली. त्या षटकात मिशेलच्या चेंडूवर कट शॉट मारायचा होता, पण तो चुकला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अपील केले, त्यामुळे मैदानावरील पंचांना निर्णयासाठी तिसऱ्या पंचाकडे जाणे योग्य वाटले.

फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसत होते की चेंडू स्टंपला लागला नाही. यष्टिरक्षक लॅथमच्या चुकीमुळे बेल्स पडल्याचे दिसून आले, परंतु तिसऱ्या पंचाने त्याला आऊट दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.