India vs New zealand 1st ODI : हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 50 षटकांत आठ विकेट गमावत 349 धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावांची खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. (ind vs nz 1st odi shubman gill double century)
हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारासह शुभमन गिलने संघाला आणखी एक चांगली सुरुवात करून दिली. रोहित 34 धावा करून बाद झाला, त्यानंतर मागील सामन्याचा शतकवीर विराट कोहलीही मिचेल सँटनरच्या एका शानदार चेंडूवर बाद झाला. इशान किशनने अवघ्या 5 धावा केल्यानंतर विकेट गमावली.
एका टोकाने गडी बाद होत असताना शुभमन गिलच्या बॅटने धावांचा पाऊस पाडत राहिला. त्याने पहिल्या 52 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत पन्नास धावा पूर्ण केल्या. यानंतर त्याने 87 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 2 षटकार मारत शतक पूर्ण केले. गिलचे हे वनडेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले. इथूनच गिलने चौकार आणि षटकारांनी डावाला सुरुवात केली आणि प्रथम 122 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या आणि नंतर शेवटच्या षटकापर्यंत पोहोचत सलग 3 षटकार ठोकत 145 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकार मारत द्विशतक पूर्ण केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.